तर मंत्री पदाचा राजीनामा देण्याचे धाडस भुजबळ दाखवतील का?-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Date:

मुंबई, दि. १६ जून – ओबीसी समाजाच्या आरक्षणावरुन राज्यातील सत्तेत सहभागी असलेले मंत्री छगन भुजबळ यांच्या संघटनेने सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला, याचा अर्थ त्यांचा सरकारवर विश्वास नाही. मग ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सरकारने सोडवला नाही, तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचं धाडस छगन भुजबळ दाखवतील का? असा थेट सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला.
आरक्षणासाठी मराठा समाजाने मूक मोर्चा काढल्यानंतर आता ओबीसी समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार आहे. समता परिषदेचे सर्वेसर्वा आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. सध्या यावरून जोरदार राजकारण सुरू झाले आहे. यासंदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, छगन भुजबळ राज्याचे प्रमुख नेते असून सरकारमधील ज्येष्ठ व वजनदार मंत्री सुद्धा आहेत. कॅबिनेट मध्ये अथवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका घेण्याची आवश्यकता होती पण दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. ओबीसीच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राजकारण साधण्याचा हा प्रयत्न आहे. जर आपल्या समाजाविषयी एवढी कदर असेल व ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सरकराने सोडवला नाही, तर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचं धाडस मंत्री छगन भुजबळ दाखवतील का? असा खोचक सवालही दरेकर यांनी उपस्थित केला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...