पुणे- मध्यंतरी राज ठाकरे यांनी नाना पाटेकरांच्या काही वक्तव्यांना चांगलेच झोडपून काढत त्यांच्यावर टीका केली होती , आता त्याच अभिनेता नाना पाटेकर यांना मुख्यमंत्री शिंदे आज दुपारी भेटायला सिंहगड पायथ्याच्या पाटेकर यांच्या फार्म हाउस वर जाणार असल्याने या भेटी मागे नेमके काय दडलेय असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होतो आहे. नाना पाटेकर यांचे पुण्यात लॉ कॉलेज रस्त्यावर हि घर आहे पण तिथे ते न भेटता एवढ्या लांबवर असलेल्या घरी पाटेकरांच्या घरी बहुधा भोजनाला जातात कि काय ? असा प्रश्न हि अनेकांना पडला आहे. पुण्यात आज सकाळी आल्यावर थेट १२ मंडळांच्या गणपतींना भेट देऊन त्यांचे दर्शन घेऊन त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडीच वाजता डोणजे गावात ,सिंहगड पायथ्याला असलेल्या नाना पाटेकरांच्या फार्महाऊसवर गणेश दर्शनासाठी जाणार आहेत . नानांनी यंदा तिकडे गणेशाची स्थापना केली .असे कळते पण येथे अवघा १५ मिनिटांचाच अवधी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यक्रम पत्रिकेत नोंदविला आहे . यामुळे येथे खरोखर गणेश दर्शन आरती होऊनच ते येथून जास्त वेळ न थांबता निघतील असे यावरून स्पष्ट पणे सांगितले जाते आहे.