पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी असाच तपास का केला नाही? -चित्रा वाघ

Date:

पुणे : पुण्यातील १४ वर्षीय सामूहिक बलात्कार प्रकरण तपासात पुणे पोलिसांनी अतिशय चांगली कामगिरी करत आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे, असे कौतुकोद्गार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काढले. याचवेळी त्यांनी हेच ते पुणे पोलीस मुख्यालय आणि इथेच संजय राठोडचं प्रकरण घडलं. पण पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांनी असाच तपास का केला नाही? असा संतप्त सवालही वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/3049513155368338

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. ८) पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेत वानवडी बलात्कार प्रकरणाची माहिती घेतली.यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या, १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार या घटना मान शरमेने खाली जाईल अशीच आहे. या प्रकरणात जवळपास १३ ते १४ आरोपी समोर आले आहेत. पुणे पोलिसांनी अतिशय चांगला व योग्य पद्धतीने तपास करतानाच आत्तापर्यंत १४ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र, पूजा चव्हाण प्रकरणातही असाच तपास पुणे पोलिसांनी का केला नाही? असा प्रश्नही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. तसेच समाजातील दिवसेंदिवस विकृती वाढत चालली आहे. १४ आरोपींपैकी १२ जण विवाहित आहे. त्यांना हा प्रकार करताना काहीच कसं वाटलं नाही असेही वाघ यांनी सांगितलं.पूजा तडस तिच्याबरोबर माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे. पूजाचा संसार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तडस यांचा हा घरगुती वाद आहे तो समोर आला कसा यात कुठलेही राजकारण केलं जातं नाही.

बीडमध्ये सध्या गुंडाराज

पोलिसांनी करुणा शर्मा यांच्यावर ज्याप्रकारे कारवाई केली ती कुठल्या आधारे करण्यात आली याची माहिती पोलिसांनी द्यायला हवी. करुणा शर्मा यांच्याबाबतीत सत्तेचा गैरवापर झाला असल्याचा आरोप करतानाच बीडमध्ये सध्या गुंडाराज सुरु असल्याची टीकाही वाघ यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

9 मार्चला महापालिकेत येणार 10 स्वीकृत नगरसेवक

पुणे- महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या,अगर थोड्या मतांनी पराभूत...

प्रज्ञा सातव यांचा राजीनामा दबावाखाली?:विरोधकांचा विधान परिषदेमध्ये गदारोळ

मुंबई-काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदार प्रज्ञा सातव...

गर्भाशय कॅन्सरशी लढा; 14 वर्षांच्या मुलींना देणार लस:देशभरात मोफत मिळणार लस, जोखीम 85 % घटेल

नवी दिल्ली-केंद्र सरकार या महिन्याच्या अखेरीस देशभरात १४ वर्षांच्या...

प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयनिहाय आपत्ती  व्यवस्थानाची टीम करा

कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’ मार्फत प्रशिक्षण द्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सूचना आपत्ती...