कोटयावधींचे टेंडर काढूनही पुणे शहर खडडयात का ? – आबा बागूलांचा सवाल

Date:

पुणे- खड्डे बुजविण्यासाठी कोट्यावधींची टेंडर प्रक्रिया राबविली जाते मग तरीही पुणे शहर खड्ड्याचा त्रास का सहन करत आहे , का हे शहरच खड्डेमय दिसत आहे ? असे सवाल करत महापालिका प्रशासनाच्या कारभारावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आणि महापालिकेतील गटनेते आबा बागुल यांनी ताशेरे ओढले आहेत .

बागुल या संदर्भात म्हणाले ,’ पुणे महानगरपालिकेकडून शहरातील रस्त्यांची कामे तांत्रिकदृष्टया योग्य न झाल्याने तसेच रस्ते खोदाई नंतर रिईनस्टेटची कामे देखील अर्धवट व निकृष्ट केल्याने शहरात अनेक ठिकाणी खडडे पडले आहेत. खडडे बुजविण्यासाठी कोटयावधींचे टेंडर काढले असूनही शहर खडडयात आहे. वास्तविक पुणे महानगरपालिकेकडून रस्ते विकसित करताना रस्ता खराब झाल्यास संबंधित ठेकेदाराने पुन्हा पूर्ववत करावा यासाठी डिफेक्ट लायबिलिटी पिरियड निश्चित केलेला असतो. असे असतानाही प्रशासनाकडून डिफेक्ट लायबिलिटी पिरियड मधील रस्त्यांवरील खडडे बुजविणेचे काम केले जात असून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम प्रशासनाकडून होत आहे. रस्ते खोदाई नंतर रिईनस्टेट देखील चुकीच्या पध्दतीने म्हणजेच डांबरी रस्त्यावर काँक्रीटने रिईनस्टेट केले जाते. अधिकारी व ठेकेदार यांचे संगनमत असल्याने रस्त्यांवर खडडे पडूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून पुणे शहर स्मार्ट झाले आहे अशा घोषणा केल्या जातात व प्रत्यक्षात मात्र शहर खडडयात गेले आहे. तरी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करतो की, शहरातील सर्व खडडे तातडीने बुजविण्यात यावेत व संबंधित अधिकारी यांनी रस्त्यांची कामे तांत्रिकदृष्टया न तपासल्याने त्यांचेवर कर्तव्यात कसूर केल्याबाबत कारवाई करण्यात यावी अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...