मुंबई दि. २० जून – पुणे येथे काल झालेल्या कार्यक्रमातील प्रचंड गर्दीला स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल व्हायला हवा असे विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले,
कालच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या गर्दीत केवळ दिडशे नाही तर सुमारे पाच हजार कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामुळे फक्त १५० कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल का करण्यात आला असा सवाल करतानाच ते म्हणाले की, जर विनायक मेटे यांच्या बीडच्या मराठा मोर्चामध्ये सहभागी तीन हजार कार्यकर्त्यांवर गर्दी जमा केल्याचा आरोप ठेवत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तर तो समान न्याय पुणे येथील कार्यक्रमाला लावला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी व मंगल प्रभात लोढा यांनी सायन हॉस्पिटलच्या वैदयकीय दुरावस्थेसंदर्भात आंदोलन केलं त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल झाले. ममता बॅनर्जींच्या हिंसाचाराच्या विरोधात बीडमध्ये जेव्हा आंदोलन केले ते दहा जणांमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन केले तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल केला,याची आठवणही दरेकर यांनी यावेळी करुन दिली.
अजीतदादांवर गुन्हा दाखल का नाही ? प्रवीण दरेकारांचा सवाल (व्हिडीओ)
Date:

