पुणे- मुळात ज्यांची संस्कृती भ्रष्टाचाराची आहे त्यांची पोलखोल पुणेकर करतील असा टोला महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर यांनी राष्ट्रवादीच्या पोलखोल या स्पर्धेला अनुसरून राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना लगावला आहे.
राष्ट्रवादीच्या जगताप यांनी आज पासून “खड्डे विथ सेल्फी” किंवा खड्ड्यांचे व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना ११ हजार १११ रुपयांचे बक्षिसे ठेवणारी भाजपाच्या विकासाची पोलखोल स्पर्धा जाहीर केली आहे. या वर प्रतिक्रिया देताना बिडकर म्हणाले कि,ज्यांनी धरणंच खाऊन टाकली, ज्यांच्या माजी गृहमंत्र्यांना अटकेची भीती वाटते,ज्यांचे पीडब्ल्यूडी मंत्री रस्त्यांच्या कामांतून जेल मध्ये जाऊन आले असतील त्यांच्या संस्कृतीत हा विकास बसणार नाहीये.राष्ट्रवादीची संस्कृती हि भ्रष्टाचाराची आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार दिसतो यातून त्यांचीच पोलखोल होणार आहे असे बिडकर म्हणाले, ते पुढे असे हि म्हणाले कि, भाजप विकासाची कामे करतेय त्यात राष्ट्रवादीची फरपट होतीये. प्रत्येक विषयात पुणेकरांचा अभिमान आम्ही सांगतो.अर्बन सिटी डिझाईन गाईडलाईन स्वीकारणारे पुणे हे देशातले पहिले शहर आहे. ज्याच्या अंतर्गत १५० किमी चे रस्ते आम्ही या ठिकाणी केले. ४५ नवनवीन डिझाईन या ठिकाणी आम्ही त्यात स्वीकारल्यात १६०० पेक्षा अधिक रस्ते, आणि फुटपाथ नवीन गाईडलाईन नुसार आम्ही केलेत .आमच्या कडे जे आहे तेच आम्ही दाखवलाय.एका दिवसात सगळं काही बदलत नसते , हि बदल स्वीकारायची प्रणाली आम्ही भाजपने स्वीकारली. औंध – बाणेर चे रस्ते बघा फर्ग्युसन रोड बघा,पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा असणे, सायकल ट्रॅक असने, ओपन जिम,हि जी अर्बन सिटी गाईडलाईन केंद्र सरकारने जाहीर केली होती त्या नुसार आम्ही हि विकासकामे केली. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले.गाईडलाईन्सची अंमलबजावणी करणारे पुणे शहर हे देशातले अव्वल ठरले आहे. त्यातून जी काही कामे केली ती आम्ही जनतेला दाखवलीत. गेल्या ३० वर्षात मध्यवर्ती भागातील ड्रेनेज पाईपलाईन ,पाणी पुरवठा इत्यादी कामे झाली नव्हती ती कामे आम्ही लाॅकडाऊनच्या काळात केली. लक्ष्मी रोड गेल्या ३० वर्षात कधी खणला नव्हता, कुमठेकर रोड व बाजीराव रोड ची तीच अवस्था होती हि सगळी शहराच्या मध्यवस्तीतील गर्दीचा भाग आहे. तिथे काही प्रमाणात खड्डे पडले होते मात्र हि सर्व दुरुस्ती एका दिवसात होत नाही त्याला थोडा वेळ लागतो व आत्ता ती कामे पूर्ण होत आहेत व लवकरात लवकर उरलेली कामे पूर्ण करा असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत असे बिडकर म्हणाले.

