Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बालगंधर्व प्रकल्पाच्या .. कारणानेच त्यांनी जोडले कला क्षेत्राशी संबध …?

Date:

पुणे-बालगंधर्व रंगमंदिराच्या ‘तथाकथित’ पुनर्विकास प्रकल्पाला विरोध जरी असला  तरी  पण जरा वेगळ्या पद्धतीने असातसाच दिखाऊ विरोध करा, .असे ठासविण्यासाठी  एका माजी पदाधिकारी असलेल्या लोकप्रतिनिधीने   हा प्रस्ताव आणल्यापासून  कलाक्षेत्राशी संबध जोडून ठेवून आपला गट या क्षेत्रात निर्माण करून ठेवल्याचे येथे स्पष्ट जाणवत  आहे .यामुळेच  नटराजसिनेमागृहाचा  बळी गेला तसा बालगंधर्व रंगमंदिराचा बळी जाणार काय ? असा प्रश्न निर्माण होतो आहे.आता कोणी कितीही सांगितले वास्तू पाडणार नाही ,वास्तूला हात लावणार नाही, तरी या प्रकल्पाने या ऐतिहासिक स्थळाची आज असलेली ‘ ‘रया’ मात्र उरणार नाही .जी ‘रया ‘ शनवार वाडा जोपासून आहे ,ती अशा स्थळांना जोपासता येणे कठीण झाले आहे ,हे वेगळे सांगण्याची गरज उरेल असे वाटत नाही. कोणी कमाई साठी किंवा अन्य कोणासाठी काहीही राजकारण करत असले तरी  शहराला मेट्रो देखील हवी आहे आणि शहराच्या ऐतिहासिक खुणा देखील जपायच्या आहेत ,अशा स्थितीत बालगंधर्व रंगमंदिराची मान अडकणे हि बाब निश्चितच अनेकांच्या मनाला वेदना देणारी ठरणार आहे.
मेट्रो चे स्थानक,त्या साठीचे बांधकाम  आणि त्याला लागणारी जागा हि बालगंधर्व रंगमंदिराची वापरली जाणार आहे. मेट्रो च्या स्थानकाला अन्य जागा नाही, संभाजी उद्यानाला हात लावता येत नाही.आणि संबंधच नसल्याने रमणबागेच्या मैदानाला किंवा लगत असल्या तर  मोकळ्या जागांना  हात लावता येत नाही.शहरात मोकळ्या जागाच नाहीत .अशा स्थितीत अगोदरच रस्ता रुंदीत झाशीच्या राणीचा पुतळा बाहेर काढून मुस्कट दबलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा आता मेट्रो स्थानकाने चुराडा मात्र होणार आहे . कोणताही वास्तू विशारद येथील मोकळी जागा वाचवून येथे मेट्रो चे स्थानक उभारू शकत नाही . नदीच्या पात्रात अगोदरच रस्ते बांधण्यात आलेले आहे . आता मेट्रो हि काहीश्या प्रमाणात नदीवरून जाणार आहे .मेट्रोच्या स्थानकाच्या बांधकामासाठी शहरात जागा उपलब्ध होणे कठीण आहे .अशा स्थितीत बालगंधर्व रंगमंदिर निवडण्यात आले आहे.  हि निवड फार पूर्वीच करून ठेवली गेली आहे. पुण्याची ऐतिहासिक पेशवेकालीन ‘कोतवाल चावडी’ कोणाला आठवतेय काय ?आज ती कोणाला ठाऊक आहे काय ? ती पाडली आणि तिथे वाहनतळ उभारले तेव्हा  लोकं ढसाढसा रडली होती . आता याच  राजकीय कुटनितीपुढे या रंगमंदिराचा आणि येथील जागेचा बळी जाईल आणि तिथे बांधकामाचे जाळे उभारले जाईल अशी शक्यता नाकरली जाऊ शकत नाही . शेजारी संभाजी बाग उरेल हे मात्र पुणेकरांचे नशीब असेल. पुण्याच्या कला क्षेत्रात सांस्कृतिकतेचा टेंभा मिरवून गल्लाभरूपण करणारे  ‘मॅनेज ‘ झाले काय आणि नाही झाले काय ? पण वाहतुकीचा बोळबट्ट्या पुढे करून या रंगमंदिराचा चुराडा येत्या काही वर्षात होईल,हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज उरणार नाही .आम्ही मराठी सिनेमासाठी असलेले प्रभात सिनेमागृह खाजगी होतो म्हणून वाचवू शकलो .पण आता येथे मोठा कारभार आहे बालगंधर्व रंग मंदिर वाचवू शकू किंवा नाही हे सांगू शकत नाही .असाही प्रवाह आहेच . भानुविलास सिनेमा ची जागा धूळ खात पडली असताना आता त्याच्या बाजूचे विजय सिनेमा ने पुढे रंग बदलल्यास नवल वाटणार नाही . या दोन्ही सिनेमागृहांमधील जागेचे अंतर हि फार छोटे आहे .
पुण्याच्या जुन्या खुणा ..आता हळू हळू नाहीश्या होतात कि काय अशी भीती वाटू लागली आहे . बदलत्या शहराचे बदलते रूप ..जुन्या खुणा जतन करवून पाहता येणार नाही काय ? हा प्रश्न भेडसावतो आहे .पण एवढे मात्र निश्चित जुन्या खुणा बुजवूनही पुण्यातील वाहतुकीचा खेळखंडोबा नाहीसा होईल याची शाश्वत हमी देखील कोणी देऊ शकणार नाही .मेट्रो आल्याने मध्यवस्तीतला काय उपनगरातला वाहतुकीचा प्रश्न कायमचा सुटेल काय ? कि दिल्ली / नवी दिल्ली प्रमाणे… जुने शहर आहे तसेच ठेऊन जुन्या शहरालगत नवी नियोजनपूर्व शहरे वसविल्याने वाहतुकीचा प्रश्न सुटेल ? यावर मंथन होणे गरजेचे आहे . लोकवस्ती होण्यापूर्वीच अगोदर भव्य रस्ते ,सुविधा निर्माण होतात आणि नंतर शहरे वसतात ती शहरे समस्यामुक्त असू शकतील . पण जिथे अगोदरच गजबजणाऱ्या लोकवस्त्या आडव्या तिडव्या उगवितात ,तेथील समस्या मात्र   कितीही कोट्यांवधीचा खर्च केला तरी आ वासुनच उभ्या राहतात अशी स्थिती आजवर दिसून आलेली आहे. त्यामुळे जुन्या पुण्याच्या खुणा मिटवून येथील वाहतूक सुरळीत होईल यावर विश्वास ठेवण्या ऐवजी पुण्यालगतच्या परिसरात भव्य दिव्य रस्ते केल्यास जुन्या पुण्यातील वाहतूक हि तिकडे वळून येथील समस्या फारशी भेडसावणार नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शहराला मेट्रो देखील हवी आहे आणि शहराच्या ऐतिहासिक खुणा देखील जपायच्या आहेत अशा स्थितीत बालगंधर्व रंगमंदिराची मान अडकणे हि बाब निश्चितच अनेकांच्या मनाला वेदना देणारी ठरणार आहे हे मात्र निश्चित .

ही आहेत  मेट्रो ने जाहीर केलेली  सहा स्थानकाची डिझाईन्स… यात बालगंधर्व रंगमंदिरा लगतच्या डिझाईनचा अर्थात समावेश अजून व्हायचा आहे.

आमचा गौरवपूर्ण इतिहास या शीर्षकाखाली मेट्रोने प्रसिद्ध केलेली हि 2 छायाचित्रे …. यात काही ऐतिहासिक वास्तूंचे फोटो आहेत . मात्र बालगंधर्व रंग मंदिराचा नाही …..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...