पुणे- पिंपरी महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यालयात ठेकेदाराकडून वर्क ऑर्डर साठी लाच मागितल्याच्या आरोपां वरून स्थायी समिती अध्यक्षासह ५ जणांना अटक झालेली असताना या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांच्या हाथी ऑडीओ क्लिप लागलेली असल्याने त्यात पैसे १६ जणांना द्यावे लागतात असा उल्लेख असल्याने नेमके हे १६ जण कोण याबाबत पोलिसांचा तपास सुरु झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड मधील भाजपच्या वर्तुळात यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे तर दुसरीकडे कारवाईला राजकीय रंग हि दिला जाऊ लागला आहे.
पोलिसांच्या रिमांड साठी दिलेल्या रिपोर्ट नुसार नितीन लांडगे यांनी स्वतः ३ टक्के ऐवजी २ टक्के करा असा आदेश स्वीय्य सहाय्यक पिंगळे यांना दिल्याची संभाषण व्हाईस रेकॉर्डवर रेकॉर्ड झालेली आहे असं म्हटलंय ..जेव्हा फिर्यादीने ३%टक्क्यांमध्ये कमी करून २ टक्के करा असं म्हटलं असताना, पलीकडून घेतलेले पैसे हे १६ जणांना द्यावे लागतात असं म्हटलंय ..त्या संभाषणाची ऑडिओ क्लिप हाती लागली असल्याने ते १६ जण कोण? याची सखोल चौकशी आता करण्यात येत आहे .. या १६ नावांमध्ये कोण याचा पोलिसाना तपास करायचा आहे .. तसेच या संबंधी स्वीय्य सहाय्यक ‘ पिंगळे’ यांना प्रश्न विचारले असता त्यांच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचं म्हटलंय .

