चॅट करता करता…

Date:

नवरात्रीतील ९ दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांचे माहितीपत्रक राहीने ‘सखी ग्रुप’वर टाकले – ‘सख्यांनो सर्वांच्या सोयीनुसार दुपारची वेळ ठरवली आहे आणि आसावरी त्याआधी २ दिवस ‘Google Meet’वर आरती, भजन, स्तोत्र यांची रंगीत तालीम घे गं, म्हणजे आयत्या वेळी अडचण येणार नाही.’ राहीने जवळजवळ फर्मानच काढले. व्हॉटसअपवर नुसते गुड नाईट-गुड मॉर्निंग आणि फॉरवर्डेड मेसेज न पाठवता कोडी, बुद्धीला खाद्य मिळेल असे काहीसे चालू ठेवायचे; नाविन्यपूर्ण काय काय शिकता येईल तेही शिकायचं असं आमच्या सखी ग्रुपवर आधीच ठरलं होतं. आता लॉकडाऊनमधील 7 महिन्यांच्या कालावधीत त्यात रोज नवनवीन उपक्रमांची भर पडते आहे. या लॉकडाऊनमध्ये दुपारी सगळी कामं आटपली की निवांत वेळात सकाळपासूनच्या मेसेजेना रिप्लाय द्यायचा आणि रात्री निजानीज झाली की निवांतपणे गप्पा मारायच्या (त्यांच्या भाषेत चॅट करायचं) हा साधारण सर्व महिलांचा व्हाट्सअपवरचा दिनक्रम. तसं पाहिलं तर पूर्वी घरातील बायकांचा निवांत वेळात गप्पा मारण्याचा नेम होताच; पण त्याचं स्वरूप बऱ्यापैकी वेगळं होतं. दुपारच्या वेळात कामाची आवराआवर झाल्यावर, थोडी  विश्रांती झाली की कुठे तरी सूप पाखडण्याच्या आवाजाने जाग यायची आणि निवडटीपणाची कामं बाकी आहेत याची आठवण यायची. मग गव्हाचा किंवा तांदळाचा डबा, सोबत चाळणी, ताट, सूप या लवाजम्यासह ग्यालरीत विराजमान व्हायचा. तोपर्यंत आजूबाजूच्या ३-४ घरातील गृहिणी जमा झालेल्या असायच्या आणि गप्पा मारत मारत निवडणं-टिपणं चालू असायचं. घरगुती गोष्टींपासून नाटक, सिनेमा, खरेदी ते अगदी राजकारणापर्यंत अनेक विषयांवरील चर्चांसोबत सुखदुःखाच्या गोष्टी अगदी सहज सांगितल्या जायच्या…मन हलकं होऊन जायचं. नव्वदीच्या दशकापर्यंत शहरातील बिल्डिंग आणि चाळ संस्कृतीमध्ये हे चित्र ठळकपणे तरग्रामीण भागात थोड्याफार प्रमाणात दिसायचं. गावाकडे पारावरच्या गप्पा किंवा कुणाच्या घरी एकत्र जमून निवडणं टिपण किंवा वर्षभराचे वाळवणाचे पदार्थ करण्याच्या निमित्ताने गप्पांना ऊत यायचा. शहरात कालांतराने सुपर मार्केटचा उदय झाला आणि चकचकीत प्लास्टिकच्या पिशव्यांमधून स्वच्छ निवडलेलं धान्य घरी येऊ लागलं. तांदूळ निवडणं कमी झालं तरी गप्पा थांबल्या नव्हत्या. कालपरत्वे चाळी पाडून टोलेगंज इमारती उभ्या राहू लागल्या; फ्लॅट संस्कृती आली, त्याबरोबरच कॉमन ग्यालरी जाऊन पॅसेज आणि बंद घरं आली. रोजच्या मनमोकळ्या गप्पांना ब्रेक लागला आणि एकत्रित निवडटिपंणही थांबलं.घरोघरी टेबलवर ट्रिंगट्रिंग करणारे फोन विराजमान झाले होते, पण त्यावर खूप गप्पा ठोकायच्या तर भरमसाठ बिल यायचं. काही वर्षांनी त्यालाही पर्याय निघाला…मोबाईल! सुरुवातीला व्यावसायिकांकडे आढळणारा मोबाईल हळूहळू नोकरदार वर्ग, तरुणाईच्याही हातात अनायसे आला. मोबाईल यत्र सत्र सर्वत्र दिसू लागला. गृहिणी ते ज्येष्ठ नागरिकांना एक विरंगुळा, एकदा का नेट पॅक भरला की अनलिमिटेड गप्पा आणि कॉल.खरंतर करोनाच्या काळात या मोबाईलने सगळ्यांनाच तारलं. गृहिणी आणि ज्येष्ठांना मोठा आधारच झाला. चॅट, व्हिडिओ कॉल, झूम यांद्वारे सगळ्यांशी कनेक्ट राहता आलं आणि सुखदुःखाच्या चार गोष्टीही झाल्या. सकाळी योग क्लास, दुपारी अवांतर गप्पा तर कधी गाण्याच्या भेंड्या व सोबत वेगवेगळे विषय, त्यावर चर्चा, ज्ञानात भर घालणारे मेसेज…इथल्या सर्वसमावेशक नेटगॅलरीत हवं तेवढं साठवता येऊ लागलं. बंदिस्त दारात कोंडलेल्या मनाला मोकळा श्वास घ्यायला मिळाला, निवांत वेळ असताना चॅट करता करता… पूर्णिमा नार्वेकर, दहिसरमो. 9820003834

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...