पेट्रोल के दाम कम हुये कि नही … भोंग्यावरून मोदींचा येत होता आवाज.. होते ते राष्ट्रवादीचे आंदोलन

Date:

पुणे-राज्यासह देशात सुरू असणाऱ्या भोंगे व इतर धार्मिक राजकारणाच्या विरोधात नागरिकांच्या ज्वलंत प्रश्न असणाऱ्या महागाईच्या विरोधात आज पुणे शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गुडलक चौकात अभिनव “भोंगे आंदोलन” करण्यात आले.या आंदोलनात नरेंद्र मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स भोंग्यांवर लावण्यात आल्या ज्याला या चौकातून जाणाऱ्या नागरिकांनी दाद दिली.
देशात महागाईने स्वातंत्र्यानंतरचे सर्व रेकॉर्ड मोडले असून, भविष्यात दुसरे कोणतेही सरकार आल्यानंतर देखील मोदी सरकारचा महागाईचा रेकॉर्ड तोडू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या गोष्टींमध्ये गेल्या ४८ वर्षात जी भाव वाढ झाली नाही, ती फक्त आठ वर्षात मोदींनी करून दाखवली आहे. विशेष म्हणजे 2014 पूर्वी निव्वळ सत्ता हस्तगत करण्यासाठी आपल्या अनेक भाषांमध्ये नरेंद्र मोदींनी महागाईबद्दल विविध गोष्टी बोलले असून आज त्याच गोष्टी त्यांना पुन्हा एकदा ऐकवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केंद्र सरकारला आरसा दाखवण्याचे काम केले आहे.
जर येत्या काळात केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारने या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करत नागरिकांना दिलासा दिला नाही तर राष्ट्रवादी युवती काँग्रेस शहरातील प्रत्येक चौकात प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर अशा प्रकारचे भोंगे लावून नरेंद्र मोदीं च्या तत्कालीन भाषणाची आठवण वेळोवेळी नागरिकांना करून देईल असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.

या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते, शहर उपाध्यक्षा श्वेता मिस्त्री ,प्रीती धोत्रे ,अपर्णा पाटसकर ,पूनम धोत्रे ,हार्डीका ओव्हाळ ,मृणाल ओव्हाळ ,प्रियांका सोनवणे,राखी श्रीराव यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...

छत्रपती संभाजीनगर येथे अग्निवीर भरती रॅलीला सुरुवात

२० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२६ औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) कॅन्टोन्मेंट...

शासकीय भाषा सुधारण्यासाठी शासनाने समिती नियुक्त करावी : महेश भागवत

अधिकाऱ्यांनो, चांगले काम करा, लिहिते व्हा अन्‌ लोकाभिमुखता जपा!महेश...

एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा नवी दिल्लीत‌ समारोप

18-19 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एआय इम्पॅक्ट समिट 2026 चा...