पुणे- मुख्यमंत्री पदावरून भाजप शिवसेनेत वाद झाल्याने विधानसभा बरखास्त होवूनही दुसरी विधानसभा अस्तित्वात येवू शकलेली नसताना आज सर्वात मोठा पक्ष म्हणजे सर्वाधिक जागा निवडून आलेल्या पक्षाने म्हणजे भाजपने राज्यपालांनी सत्ता स्थापने साठी आमंत्रण दिलेले असतानाही आपण सत्ता स्थापन करू शकत नाही असे आज सायंकाळी राज्यपालांना भेटून सांगितले . या दरम्यान शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अद्याप देखील युती तुटल्याचे जाहीर केले नाही . किंवा आमची युती आता आहे किंवा नाही याबाबत काहीही वाच्यता केलेली नाही . या दोन्ही पक्षांनी एकत्रित पणे युती करून निवडणूक लढविली आणि बहुमत प्राप्त केले होते.
युती तुटली कि नाही ..अजूनही कोणी स्पष्ट बोलेना …
Date:

