परमबीर सिंह, अनिल देशमुख नेमके आहेत कुठे ? राष्ट्रवादीने सांगावे देशमुख आहेत कुठे ?-विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

Date:

मुंबई, दि. १३ सप्टेंबर – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. मात्र ते आता गायब असून नेमके कुठे आहेत ? अनिल देशमुख राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहकारी व महत्वाचे नेते असल्यामुळे ते नेमके कुठे आहेत हे पक्षाला माहीत असणे अपेक्षित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी किंबहुना पक्षाने अनिल देशमुख नेमके कुठे आहेत हे सांगण्याची आवश्यकता असल्याचे आव्हान विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षाला केले आहे.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, मागील काही महिन्यांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला असून आज प्रसारमाध्यमांद्वारे अनिल देशमुख व माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह गायब आहेत, अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. मग अनिल देशमुख आता नेमके कुठे आहेत, असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले, अनिल देशमुख मतदारसंघात आहेत, मुंबईत आहेत की इतर ठिकाणी, याचा शोध सीबीआय, ईडी घेतीलच. परंतु सर्व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी समोर यावे, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.
दरेकर म्हणाले, मुंबईचे पोलिस आयुक्तसुद्धा सापडत नाहीत, खरे म्हणजे ते सेवेत डीसकनेक्टेड नसताना राज्याच्या गृहमंत्र्यांना माहीत असणे अपेक्षित आहे. एकंदर राज्यामध्ये अशा प्रकारची गोंधळाची स्थिती निर्माण झाली असेल तर नेमके राज्याच्या गृह विभागात काय चालले आहे हे समोर येत असल्याचे दरेकर यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...

शरद पवार, पार्थ पवार, रामदास आठवले,विनोद तावडे, ज्योती वाघमारे,माया ईवनाते आणि रामराव वडकुते राज्यसभेवर

मुंबई- महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी जाणाऱ्या नेत्यांची नावे आता समोर...

दुबईहून आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील २४६ पैकी १२८ नागरिक सुखरूप परत

९० नागरिकांना अद्याप विमानाचे तिकीट उपलब्ध झालेले नाही पुणे, दि....