Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कुठे नेऊन ठेवले आपल्या कसब्याला ? रवींद्र धंगेकर यांचा सवाल

Date:

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता तरीही …

पाणीपुरवठा, पार्किंग, जुन्या वाड्यांचे प्रश्न,अरुंद रस्ते व वाहतूक कोंडी प्रश्न जैसेथे च का ?

पुणे-शहराच्या मध्यभागी असणारा आपला कसबा विधानसभा मतदारसंघ आता सर्वप्रकारच्या नागरी प्रश्नांचे आगर बनला असून, त्यामुळेच भाजपाला विचारावेसे वाटते की कुठे नेऊन ठेवले आपल्या कसब्याला? केंद्रात, राज्यात व पुण्यातही भाजपा सत्तेवर असतानाही कसब्याचे प्रश्न का सोडविले नाहीत? अरुंद रस्ते व वाहतूक कोंडी, कमी दाबाने पाणीपुरवठा, पार्किंग, जुन्या वाड्यांचे प्रश्न, मध्यवर्ती बाजारपेठेचे प्रश्न, भाजीमंडई व मिनिमार्केटचे प्रश्न असे असंख्य प्रश्न असतानाही आणि आमदार व सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे असतानाही त्यांच्या निष्क्रीयतेमुळेच कसबा मतदारसंघातील नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.  महाविकास आघाडीतर्फे मात्र हे प्रश्न सोडविणे हाच माझा अजेंडा असेल, असे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले, पदयात्रा संपल्यानंतर ते बोलत होते. 

आज सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी नारायण पेठेतील मुरलीधर भोजनालय येथून पदयात्रेस सुरुवात झाली. कॉंग्रेसचे गोपाळ तिवारी यांनी सर्वांचे स्वागत केले आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पदयात्रेस सुरुवात झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रारंभी गोपाळ तिवारी यांनी पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ देऊन धंगेकर यांचा सत्कार केला. यावेळी ब्राम्हण समाजाचे अनेक स्त्री- पुरुष सहभागी होते. तिन्ही पक्षाचे झेंडे, धंगेकरांचे कटआउट्स यासह पदयात्रा निघाली. पदयात्रेच्या प्रारंभी धंगेकरांच्या पदयात्रेची माहिती सांगणारी रिक्षा व पाठोपाठ शेकडो कार्यकर्ते अशी ही पदयात्रा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात होते. या पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, कमलताई व्यवहारे, दीप्ती चवधरी, लता राजगुरू, वैशाली मराठे, नीता परदेशी, संगीता तिवारी,  अंजली सोलापुरे, गौरव बोऱ्हाडे, साहिल राऊत,  ऋषिकेश मिरकर, नाना करपे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश नलावडे, रोहन पायगुडे, अजिंक्य पाटकर, स्वप्नील थोरवे, संजय मते, राहुल पायगुडे, अरुण गवळे, संतोष बनकर, दीपक पोकळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल येनपुरे, परेश खांडके, धनंजय देशमुख, संदीप गायकवाड, निरंजन दाभेकर, नितीन परदेशी, राजेंद्र शिंदे, सतीश वाघमारे आदी प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. नारायण पेठ व शनिवार पेठ येथून सर्व प्रमुख रस्त्यांवरून जाताना अनेक स्थानिक नागरिक पुढे येऊन धंगेकरांशी हस्तांदोलन करत होते. ‘यावेळी बदल निश्चित करणार’ असे सांगत ते धंगेकरांना पाठींबा देत होते.  

नारायण पेठेतील कबीर बागेत घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुठेश्वर मंडळाने त्यांचे स्वागत केले.  यावेळी श्री गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त स्वानंदी भजनी मंडळाच्या भगिनींनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी मंडळाचे गणेश भोकरे यांनी ‘धंगेकर हे सर्वसामान्यांचे कार्यकर्ते आहेत आणि विकासाची त्यांना दृष्टी व धमक आहे’ असे सांगितले.

पुढे आनंद तरुण मंडळाचे स्वप्नील थोरवे यांनी शिंदेशाही पगडी, शाल व श्रीफळ देऊन धंगेकरांचा सत्कार केला. तेव्हा उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर हसबनीस बखळ सार्वजनिक मंडळातर्फे धंगेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.  त्यानंतर भारत मित्र मंडळातर्फे फटाक्यांच्या आतषबाजी करून स्वागत झाले. त्यावेळी बाळासाहेब दाभेकर यांनी त्यांचा भव्य सत्कार करून ते या पदयात्रेत सहभागी झाले. सदाशिव पेठ नवरात्र महोत्सवतर्फे त्यांना फेटा बांधून त्यांचा सत्कार एकला गेला. चौकाचौकात त्यांचे जोरदार स्वागत होत होते. नागरिक स्वतःहून पदयात्रेत सहभागी होत होते. अखेरीस चार तासानंतर ही पदयात्रा खजिना विहिर येथे संपली.

रविवार दि.१२ फेब्रुवारी संध्याकाळी ४:०० वाजता प्रभाग क्र.१८ मधील श्रीनाथ मंडळ खडकमाळ आळी येथून या पदयात्रेस प्रारंभ झाला. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत होता. लाउड स्पीकरवरील घोषणा त्यात भर घालत होत्या. तिन्ही पक्षांचे झेंडे धंगेकर यांचे बॅनर्स व पोस्टर्स यामुळे वातावरण निवडणूकमय झाले होते. या पदयात्रेत  कॉंग्रेसचे कमल व्यवहारे, संजय बालगुडे, विनय ढेरे, आयुब पठाण, उमेश काची, हेरॉल्ड मॅसी, अश्फाक शेख, हेमंत राजभोज, राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, हेमंत येवलेकर, हर्शल भोसले, गणेश माकम, गणेश नलावडे, शिल्पा भोसले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे चंदन साळुंखे, संदीप गायकवाड, रुपेश पवार, अनिकेत थोरात, सागर गंजकर, पंकज भरीदे, मनोज परदेशी, संतोष गायकवाड, चंद्रकांत रणदिवे, अनिल खेंगडे, नितीन दलभंजन आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या पदयात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण सहभागी झाल्यानंतर कार्यकर्त्यांना अधिकच जोश आला. ‘धंगेकर झिंदाबाद’च्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. मामलेदार कचेरीची मागील बाजू, पांगघंटी चौक, धनगर आळी मार्गे वालवार आळी येथे पदयात्रेची सांगता झाली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...