मुंबई, दि. ६ नोव्हेंबर- अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयातील घटना अतिशय दुदैर्वी व संतापजनक आहे. सरकारच्या ढिसाळ कारभाराच्या हा नमुना आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या बेजाबदारपणामुळे घडलेली ही दुर्घटना निषेधार्ह आहे. आता ही दुर्घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली जाईल. पण आगीच्या या घटना वारंवार घडत आहेत. भंडारामधील आगीत १० बालकांचा मृत्यू झाला. विरारला विजय वल्लभ हॉस्पिटलाची आगीची दुर्घटना, मुलुंडमधील ड्रीम मॉलमधील आग, नाशिकला प्राणवायु गळतीमुळे अनेकांना आपले जीव गमावावे लागले. प्रत्येक वेळी सखाले चौकशी करण्याचे आदेश सरकार देते. पण अशी दुर्घटना घडू नये यासाठी आवश्यक उपाययोजना सरकारकडून केल्या जात नाही. यावरुन या सरकारचे आरोग्य व्यवस्थेमध्ये किती लक्ष आहे हे दिसून येते. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या आगीच्या दुर्घटना प्रकरणात जी चौकशी करण्यात आली त्या चौकशीचे नेमके काय झाले याचा लेखा जोखा महाराष्ट्रातील जनतेसमोर यायला हवा. कारण मृत्युचे तांडव हे अश्या प्रकारच्या दुर्घटनेतून होत आहे पण संवेदनहीन सरकारकचे याकडे लक्ष नाही, त्यामुळे किमान सरकारने आता तरी जागे व्हावे व अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी सरकार कधी उपाययोजना करणार- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

