Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बंद पडलेल्या मराठी शाळा सुरु करण्यासाठी सरकार काय करणार- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचा सवाल

Date:


मुंबई, दि. २४ मार्च- मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, पण दुदैर्वाने गेल्या १० वर्षाच्या काळात मराठी शाळा मोठया प्रमाणात बंद पडल्या, तर या मराठी शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांची संख्याही झपाट्याने कमी झाली आहे.एका बाजूला सरकार मराठी राजभाषासाठी कायदा करीत असताना दुसरीकडे मराठी शाळांची दुरावस्था होत आहे,त्यामुळे ज्या मराठी शाळा बंद पडल्या आहेत त्या पुन्हा सुरु करण्यासाठी व मराठी शाळा बंद पडू नये यासाठी महाविकास आघाडी सरकार काय उपाययोजना करणार असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. तसेच ज्या १५० शिक्षकांनी मराठीतून शिक्षण घेतले म्हणून त्यांना मुंबई महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे केवळ मराठी शिक्षण घेणा-या या १५० शिक्षकांना मुंबई महापालिकेच्या शाळेत तात्काळ सामावून घेण्यात यावे अशी मागणीही प्रविण दरेकर यांनी यावेळी केली.

महाराष्ट्र राज्यातील स्थानिक प्राधिकरणांच्या शासकीय प्रयोजनांसाठी मराठी भाषेचा वापर करण्याकरिता तरतूद करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या विधेयकावरबोलताना दरेकर यांनी सांगितले की, मराठी भवन उभारणी, मराठी भाषा संवर्धन, भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य या फक्त घोषणाच राहिल्या. मराठी भाषेसाठी सरकार कायदा करीत असताना मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नाव मुंबई पब्लिक स्कूर आहे. ते सुध्द बदलण्याची गरज आहे असेही दरेकर यांनी निदर्शनास आणून दिले.

आजपर्यंत मराठीचे भावनिक राजकारण करून शिवसेनेने सत्ता मिळवली. परंतु निवडणुकीपुरते मराठीचे राजकारण करणाऱ्यांनी मुंबईतल्या मराठी शाळाच हद्दपार केल्या. पात्र उमेदवारांना शिक्षक पदासाठी ९ ऑगस्ट २०१९ शिफारसपत्रे दिली. यापैकी १५० उमेदवारांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमात झाल्याने त्यांना महापालिकेने नोकरी दिली नाही. या मराठी तरुणांनी तुमच्या वचनाची आठवण करुन देण्यासाठी शंभर दिवस आंदोलन केले. त्या आंदोलनाची दखल घ्यायलासुध्दा पालिकेतील सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. असा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

हिंदी माध्यमाची पटसंख्या मराठीपेक्षा दुप्पट आहे. उर्दू माध्यमाची पटसंख्यादेखील मराठीपेक्षा दुप्पट आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सभागृहात आकडेवारीदेखील सादर केली. माध्यम हिंदी (शाळांची संख्या २२७, पटसंख्या ६३२०२), माध्यम उर्दू (शाळांची संख्या १९३, पटसंख्या ६२५१६), माध्यम मराठी (शाळांची संख्या २८०,पटसंख्या ३३११४). दरेकर यांनी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्यांना पालिका सेवेत घेण्यात यावे अशी मागणी केली.
मराठी शाळांची स्थिती
वर्ष शाळा विद्यार्थी
२०१०-११ ४१३ १,०२,२१४
२०११-१२ ३९६ ९२३३५
२०१२-१३ ३८५ ८१११६
२०१३-१४ ३७५ ६९३३०
२०१४-१५ ३६८ ६३३३५
२०१५-१६ ३५० ५८६३७
२०१६-१७ ३२८ ४७९४०
२०१७-१८ ३१४ ४२५३५
२०१८-१९ २८७ ३६५१७
२०१९-२० २८३ ३५१८१
२०२०-२१ २८० ३३११४

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शांतता पुणेकर वाचत आहेत मध्ये उद्यम विकास सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग

नागरिकांनी रोज रात्री झोपताना काहीतरी वाचण्याची सवय लावावी -...

महाराष्ट्रात थंडी वाढणार,पुढील 48 तास धोक्याचे

मुंबई- महाराष्ट्रात मुंबईसह उपनगरात गारठा वाढू लागला आहे. दुसरीकडे,...

राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे (CPA) ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा भव्य शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना राष्ट्रीय...

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया – भव्य पोस्टर प्रदर्शित

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे...