नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत डॉ. सुश्रुत सरदेशमुख यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पुणे, दि. 27 ऑगस्ट : लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय फुलगाव येथे शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘विद्यार्थी जीवनातील सकस आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व’ याविषयावर डॉ. सुश्रुत सरदेशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सुश्रुत सरदेशमुख म्हणाले की, सध्या जंक फूडचे आरोग्यावरील दुष्परिणामांचे प्रमाण वाढत चालले आहे. मुलांच्या बौद्धिक, मानसिक, शारिरीक वाढीवर जंक फूडचा मोठा परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. परिणामी त्यांचे शारिरीक व मानसिक संतुलन ढासळत आहे. आपण आता या मुलांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरील समस्यांवर बोलताना डॉ. सरदेशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये अपचन, त्वचा विकार, केस गळती, थकवा यासारख्या समस्या आहारातील चुकीच्या पद्धतीमुळे होत आहेत. त्यामुळे आहाराबाबत विद्यार्थी जीवनात सजग राहिले पाहिजे. मनाची एकाग्रता आणि अभ्यास करण्यासाठी लागणारे मनोबल याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यात्म, संस्कृती व आपले राहणीमान यांची सांगड घालण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण त्यांनी केले.
यावेळी लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्राचार्य व संस्थेचे संचालक प्रा. नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, टेन टी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य शोफेमॉन, लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य देनसिंग, लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूलच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी, प्रशासन अधिकारी अर्जुन शिंदे, प्रा.अफरोज मुलाणी, पांडुरंग जगताप, विकास तिरखुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी ऋतुजा कुलकर्णी, दिपाली भंडारी, दिलीप देवढे, शुभांगी चव्हाण, आनंद त्रिपाठी, सचिन खंदारे, निगम, शंकर साळुंके, योगेश कानडे, प्रियांका व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिथा जयगडे या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमृता परिट हिने केले तर कार्यक्रमाचे संयोजन पूनम भोसले, शरद मंडलिक, राजेंद्र भोसले यांनी केले.