महागाई , छापेमारी,निवडणुका यावरही केले भाष्य
पुणे-आर्यन खानसोबत जे घडले एक आई म्हणून वाईट वाटते, त्याच्याकडे काहीच सापडले नाही तर 26 दिवस कोठडीत का ठेवले? खा. सुप्रिया सुळे क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर जामिनीवर सुटका झाली आर्यन खानबाबत जे घडले ते एक आई म्हणून वाईट वाटते. ज्याच्याकडे काहीच सापडले नाही त्याला 26 दिवस कोठडी ठेवण्यात आले, हा कुठला न्याय? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितीत केला.शाहरुख खान , बॉलीवूड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावे आहेत . अशा प्रकरणामुळे महाराष्ट्राचे नाव बदनाम होते.
ड्रग्ज तर खूप मोठी गोष्ट आहे. मी तर तंबाखूच्या विरोधात आंदोलन करत असते. अशा सर्व अंमली पदार्थातून समाजात मुलांचे पुनर्वसन महत्त्वाचे आहे. त्यांना तुरुंगवास देणे नाही. त्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे. मात्र, काही अधिकारी अशी काही भाष्य करतात आणि कोणाच्याही मुलांवर अन्याय होत असेल तर हे महाराष्ट्र आणि देशासाठी हे योग्य नाही. बॉलिवूड हे इंटरनॅशनल आहे. भारताची आणि महाराष्ट्राची ओळख ही जगामध्ये बॉलिवूडबाबत विचारत असतात. त्यामुळे अशा जेव्हा चुकीच्या गोष्टी होतात तेव्हा महाराष्ट्राचे नाव खराब होतेच. मात्र, त्याचबरोबर देशाचेही नाव खराब होते. त्यामुळे ड्रग्जच्या विरोधात आपण सर्वांनी आंदोलन केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यात निवडणुकांची तयारी सुरू आहे. या निवडणुकीत पुण्यात महापौर राष्ट्रवादीचाच होणार आहे. पुण्यात महाविकास आघाडी होणार का, याचा निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ घेतील, असेही सुप्रिया सुळेंनी सांगितले.