राष्ट्रवादी कॉंगेस पर्वती चा सवाल
पुणे- महापालिकेची ५ वर्षांची टर्म संपायला आली असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात जाहिराती ,फ्लेक्स्बाजी करून भाजपचे नेते आणून प्रस्तावित उड्डाणपुलांचे भूमिपूजन केले जाते आहे ,प्रत्यक्षात हि कामे सुरु झालेली नसताना महापालिका निवडणुका तोंडावर असताना आचारसंहितेपूर्वीच होणारे हे कार्यक्रम नक्की नागरिकांसाठी होता आहेत कि त्यांना गाजरे दाखवून मतांसाठी होत आहेत ? असा सवाल पर्वती विभागातील राष्ट्रवादीचे नेते नितीन कदम आणि सिद्धेश बनकर यांनी उपस्थित केले आहेत . या संदर्भात त्यांनी हि फ्लेक्स लावत भाजपाला हे प्रश्न विचारून जनतेमध्ये या संदर्भात विचारमंथनासाठी आवाहन केल्याचे सांगण्यात येते आहे.
सिंहगड रस्त्यावर आणि कात्रज चौकात उड्डाणपुलांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या पर्वती विभागाने हे फ्लेक्स लावले आहेत .
पर्वती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने या विषयावर खालील मुद्दे उपस्थित केले आहेत .
1) यापुर्वीचा 30 कोटींचा मंजुर केलेला निधी गेला कुठे…?
उड्डाणपुलाच्या नावाखाली नागरिकांची फसवणुक का..?
2) पुरेसा निधी उपलब्ध नसुन देखील महापालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन उदघाटन कोणासाठी..?
ये पब्लिक है सब जानती है…!
3) उड्डाणपुलाच्या कामाची सुरवात केल्या नंतर नागरीकांनी वाहतुक करायची कोठुन…!
पर्यायी रस्ते पुर्ण झालेत का..?
4) आधी पर्यायी रस्ते मगच उड्डाणपुल..!सिंहगड रोडवरिल सामान्य नागरिकांचे हाल अजुन किती दिवस …?
5) राजाराम पुल ते माणिकबाग पर्यंतचा प्रवास चालु घडीला अर्ध्या तासात संपतो तर उड्डाणपुलाचे काम चालु असताना किती वेळ लागनार…?

