पुणे-महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आणि महापौरांनी अनेक वेळा लस खरेदीची निव्वळ घोषणा केली.पण प्रत्येक्षात आजतागायत हि घोषणा फसवीच ठरली आहे असा आरोप करत महापौर साहेब लस खरेदीचे झाले तरी काय ? असा सवाल महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी थेट महापौर मोहोळ यांना केला आहे.
सौ.धुमाळ पुढे म्हणाल्या कि, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाउन लागू करण्यात आले असून गोरगरिबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.कोरोनावर लसीकरण हा एकमेव मार्ग दिसत आहे.पुणे महानगरपालिका लस खरेदीचे टेंडर काढणार अशी घोषणा करण्यात आली असून प्रत्यक्षात कृती झालेली नाही.मुंबई महानगरपालिकेने लस खरेदी साठी टेंडर काढलेले आहे.यामध्ये सहभागी कंपन्यांना संपर्क करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम६७ (३)(क) चा वापर करून लस खरेदी करावी अशी मागणी आम्हीच पुर्वीच केली असुन मुंबई महानगरपालिकेच्या लस खरेदी टेंडर मध्ये ९ कंपन्या सहभागी झाले असुन लस पुरवठा करण्यास तयार अश्या बातम्या वृत्तवाहीनीच्या माध्यमातुन येत आहेत. पुणे महानगरपालिकेतील सत्त्ताधारी लस खरेदी करण्यास राज्य शासनाची परवानगी लागते का अशी चर्चा घडवली असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य शासनाच्या परवानगी आवश्यकता नाही असे स्पष्ट केले आहे. भाजप सत्त्ताधा-यांना पुणेकरांना लस द्यायची आहे, याचा पुर्ण विसर पडला असे म्हटले तरी वावगे होणार नाही.
पुणे महानगरपालिकेने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र प्रस्तावित केले असुन लसीकरणाचे पुर्ण नियोजन प्रशासनाने केलेले आहे ,परंतु लस अभावी सदर केंद्र चालु झालेली नाहीत. तरी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम६७ (३)(क) चा वापर करून मुंबई महानगरपालिकेच्या लस खरेदी टेंडर मध्ये ९ कंपन्यांना संपर्क करुन पुणेकरांसाठी तातडीने लस खरेदी करावी,अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

