दिल्ली दि.1 – भारताचे भाग्यविधाते; घटनाकार ; महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल ला संपूर्ण विश्वात साजरी होते. महाराष्ट्र्र राज्यासह देशात काही राज्यात 14 एप्रिल ला ससर्वजनिक सुट्टी असते मात्र संपूर्ण देशात 14 एप्रिलचा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून अद्याप जाहीर झाला नव्हता.आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार ने 14 एप्रिल हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस म्हणून संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे. या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण हार्दिक स्वागत करीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या निर्णयबद्दल अभिनंदन आणि आभार मानत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार; जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ;कायदेतज्ज्ञ; प्रज्ञासूर्य भारताचे पहिले कायदा मंत्री;दलित बहुजन; महिला; कामगार सर्व वर्गांचे कैवारी उद्धारक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल योगदान आहे. त्यांचा जयंती दिवस 14 एप्रिलला राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करून केंद्र सरकार ने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कर्तुत्वासमोर नतमस्तक होऊन विनम्र अभिवादन केले आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस म्हणून संपूर्ण देशात 14 एप्रिल ला राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या केंद्र सरकार च्या निर्णयाचे आपण मनःपूर्वक स्वागत करीत असल्याचे ना रामदास आठवले यांनी आज सांगितले.