पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक १८ चे मनसेचे पुणे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले
याप्रसंगी राज ठाकरे म्हणाले प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपआपल्या प्रभागांमध्ये जनसंपर्क वाढून लोकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्यावे या कार्यक्रमासाठी मनसेचे नेते बाबू वागसकर, किशोर शिंदे, अजय शिंदे, सुशीला नेटके, वनिता वागसकर, गणेश भोकरे, प्रशांत मते, प्रकाश ढमढेरे, संगीता तिकोने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन प्रल्हाद गवळी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळा देवळे, हेमंत कंठाळे ,साईनाथ चकोर,संदीप ढवळे,उमेश लोखंडे,विकास गवळी, गौरव गवळी,दक्ष गवळी , श्रीराज पवार, विहंग कोटकर, यश येते, प्रज्वल कसबे, भूषण शिदे, युवराज लोखंडे, सौरभ पडावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी नादब्रम्ह ढोल पथक, आढाव सनईवादक पाचशे ते सहाशे फेटे धारी मनसे सैनिक उपस्थित होते तसेच चाफ्याचा हार व तलवार देऊन प्रल्हाद गवळीनी राज ठाकरेंचे स्वागत केले.
प्रभाग क्रमांक १८ मध्ये राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत
Date:

