मॉन्सूनला अखेर सूर गवसला, बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा विकसित

Date:

पुणे-मान्सूनने उपसागरी भागात वेळेआधी आगमन केले असले तरी, मुख्य भूप्रदेशात मान्सूनचे विलंबाने आगमन झाले आहे. केरळ मध्ये सुद्धा नेहमीपेक्षा सात दिवसाच्या विलंबाने मान्सून पोहोचला, तेव्हापासून मान्सूनची प्रगती अत्यंत मंद असून आताही प्रगतीचा वेग मंद आहे. मान्सून प्रणाली किनारपट्टीच्या दोन्ही बाजूला तयार होते. तथापि, बंगालच्या खाडीत तयार होणारी प्रणाली अधिक फायदेशीर आहे, कारण ती किनाऱ्यापासून जवळ असून मान्सूनच्या प्रगतीस कारणीभूत ठरते. दुसरीकडे, अरबी समुद्रातील प्रणाली जरी तात्पुरता पाऊस देत असली तरी ती नुकसानकारक आहे कारण या प्रणाली मुळे आर्द्रता आणि पाऊस कमी प्रमाणात होतो

बंगालच्या खाडीतील कमी दाबाचा पट्टा

आता, मंद सुरुवात झाल्यानंतर, दररोजची पावसाची कमतरता आणि एकत्रित उणीव ४३ टक्के इतकी वाढली असताना, आता मात्र मान्सून योग्य टप्प्यावर धडकला आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेली चक्रवाती प्रणाली गेल्या २४ तासांत ताकद वाढल्यामुळे अधिक संघटित झाले आहे. शिवाय, मेघ संरचना आणि उपग्रह प्रतिमांनी सूचित केले आहे की ही प्रणाली आधीच कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाली असून बंगालच्या खाडीत उत्तरेला स्थित आहे.

प्रणालीची हालचाल

कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे या प्रणालीमध्ये उद्यापर्यंत थोडी हालचाल होण्याची शक्यता आहे. यावेळी प्रणाली अधिक वेग घेऊ शकते. २२ जूनच्या आसपास,हि प्रणाली छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भाग, विदर्भ आणि मध्यप्रदेशाच्या पूर्व भागाकडे वळेल. त्यानंतर २३ जून च्या आसपास ही प्रणाली मध्य महाराष्ट्राकडे वळेल आणि अखेरीस ती कोकण आणि गोवा या भागातून अरबी समुद्राकडे जाईल आणि कमकुवत होईल.

खाडीतील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस

कमी दाबाचा पट्टा थोड्या काळासाठी कायम असल्याने ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, तेलंगाना, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर अंतर्गत कर्नाटक,कोकण आणि गोवा तसेच मुंबई मध्ये पाऊस दिसून येईल. शिवाय, खाडीतील या प्रणालीमुळे पावसाची गतिविधी वाढल्यामुळे केरळच्या पश्चिम किनारी भागात आणि कर्नाटकच्या किनारी भागात पावसाचे प्रमाण वाढेल.

मान्सूनची प्रगती

नेहमीप्रमाणे या कालावधीपर्यंत होणारी मान्सूनची जोमदार सुरुवात अद्याप झाली नाही, किनारी भागात पाऊस झाला असून अंतर्गत भागात मात्र अजून पाऊस झालेला नाही. तथापि, या प्रणालीमुळे केवळ पाऊसच येणार नाही तर हैदराबादसह तेलंगाणा, बेंगळुरूसह उर्वरित कर्नाटक, महाराष्ट्रात मुंबईसह कोंकण क्षेत्र तसेच आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम,ओडिशातील भुवनेश्वर आणि कोलकाता समवेत बंगाल मध्ये मान्सूनची सुरुवात होईल.

याउलट बिहार आणि झारखंडला आणखी काही दिवस पावसाची थांबावे लागेल कारण हा प्रणालीच्या मागोमाग एक प्रणाली आहे, ज्यामुळे मान्सूनचा प्रवाह सुरुच राहील. याशिवाय, या प्रणालीमुळे बिहार आणि झारखंड, पूर्व उत्तरप्रदेशसह, पश्चिम बंगालवर मान्सूनला उपयुक्त असलेल्या प्रवाहाची स्थापना होईल.

पावसाची कमतरतेत सुधारणा

कमी दाबाच्या पट्यामुळे होणाऱ्या पावसामुळे पावसाची तूट काही प्रमाणात भरून निघेल. काही ठिकाणे वगळता केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तामिळनाडु, ओडिसा, कोकण आणि गोव्यात मान्सूनची अजून समाधानकारक सुरुवात झाली नाही, काही राज्यांत तर पावसाची कमतरता ५० टक्क्यांहून अधिक आहे. तथापि, आता, या पावसामुळे, हि कमतरता काही प्रमाणात कमी होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...

भाजपचे नेते गुंडाना पोसण्याचे काम करत आहेत-मिलिंद एकबोटे

तर भाजपाचीही काँग्रेससारखी दयनीय अवस्था होईल हिंदुत्वाची उपेक्षा कराल, तर हिंदुत्ववादी...