‘तो ‘ आत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.”-केंद्रिय मंत्री नारायण राणे

Date:

मुंबई-सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर“दिशा सॅलियानचं कोणी केलं? कोण मंत्री उपस्थित होता? अद्याप या गोष्टीचा छडा का लागलेला नाही? पूजा चव्हाणचं देखील तेच. आता गप्प बसणार नाही. त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत पाठपुरावा करू असा धडक इशारा केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिला .

केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. २४ ऑगस्टला रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप करत सडकून टीका केलीय.

या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर टीका करताना राणेंनी दिशा सालियान प्रकरणावरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दिशा सालियान ही सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वीच म्हणजेच ९ जून २०२० jरोजी मध्यरात्री बहुमजली इमारतीवरून पडून दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात युवा नेत्याचा हात असल्याचा दावा करत राणेंनी पुन्हा एकदा या प्रकरणावरून ठाकरे सरकरावर निशणा साधला आहे. नाव न घेता ते म्हणाले, “दिशा सॅलियानचं कोणी केलं? कोण मंत्री उपस्थित होता? अद्याप या गोष्टीचा छडा का लागलेला नाही? पूजा चव्हाणचं देखील तेच. आता गप्प बसणार नाही. त्या मंत्र्याला अटक होईपर्यंत पाठपुरावा करू ते ही लोकशाही पद्धतीने . कोर्टात जाऊ पाहू कोण वाचवत?” असं म्हणत राणेंनी ठाकरे सरकारला धमकीवजा इशारा दिलाय.पुढे राणे म्हणाले, “ज्याने हे कृत्य केलं आहे, त्या प्रकरणात जे कुणी होते ते आत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.” असं म्हणत जनआशिर्वाद यात्रा सुरु राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

९ जूनच्या मध्यरात्री बहुमजली इमारतीवरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. तर १४ जूनला सुशांत मृतावस्थेत आढळला. या दोन्ही घटनांमध्ये समान धागा असावा, असा तर्क सुरुवातीला काढण्यात येत होता. दरम्यान, गेल्यावर्षी दसरा मेळव्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता राणे कुटुंबियांवर केलेल्या टीकेनंतर संतापलेल्या नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणाची मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करावी अशी मागणी केली होती.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर नितेश राणे यांनी ट्विट आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केेले होते. “दुसऱ्यांची ‘पिल्ल’ वाईट. मग यांनी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रवणबाळ” जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग त्या दिशा सालियानच्या केसची मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करुन दया. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...