शिवसेनेचे सगळे नखरे आम्हाला ठाऊक-मुख्यमंत्री

Date:

मुंबई-शिवसेनेचे सगळे नखरे आम्हाला ठाऊक आहेत आणि ते आमच्यासोबतच राहतील कुठेही जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपाला अहंकार नडला अशी टीका पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंनी केली. मात्र आम्ही अहंकारी नाही आम्ही जमिनीला धरून असलेली माणसं आहोत असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेनेने तुमची साथ सोडली तर तुम्ही राज्यात काय कराल? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी शिवसेना आमची साथ सोडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचे नखरे पाहून तर ते तुम्हाला साथ देतील असे वाटत नाही असे मुलाखतकाराने विचारताच शिवसेनेचे नखरे जे तुम्हाला दिसतात तसे नाहीत आम्हाला सगळे नखरे ठाऊक आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

सामनामधील अग्रलेखांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. सामनातले अग्रलेख वाचले तर वाटते की युती होणे अशक्य आहे यावर तुम्ही काय म्हणाल असे विचारताच, अहो म्हणूनच मी सामना वाचत नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यातला कलगीतुरा कायमच रंगलेला असतो. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे भाजपावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. असे असले तरीही आम्हाला त्यांचे सगळे नखरे ठाऊक आहेत ते आमची साथ सोडणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच राज्यांमधील निवडणुकांबाबत विचारण्यात आले. त्यावेळी या निवडणुकांच्या निकालांवरून लोकसभेचा अंदाज बांधू नका लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राहुल गांधी विरोधकांचे नेतृत्त्व करत आहेत हे चांगलं आहे, पुढची दहा वर्षे तरी त्यांना विरोधातच बसायचे आहे असेही मुख्यमंत्री म्हटले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ...

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या...

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस...