पाणी वाटपात प्रेशरचा असमतोल: प्रशासन आणि तत्कालीन पदाधिकारी सोडून राष्ट्रवादीने केले भाजपा खासदारांच्या घरासमोर आंदोलन

Date:

पुणे- पाणी वाटपात प्रेशरने होणाऱ्या असमतोल पणा च्या निषेधार्ह गेली ५ वर्ष पुणे महानगरपालिकेत सत्ता उपभोगलेल्या तत्कालीन महापौर ,उपमहापौर ,सभागृह नेते ,भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले आमदार तसेच महापालिका आयुक्त यांच्या घरासमोर आंदोलन न करता आज भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.आंदोलना प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते अंकुश काकडे, प्रवक्ते प्रदीप देशमुख , रवींद्र माळवदकर शशिकांत जगताप आसिफ शेख गणेश नलावडे , सचिन शेलार , वनीता जगताप , नीता गलांडे युसुफ शेख, संजय गायकवाड आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले,’ “पुणे शहरात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला गेल्या पाच वर्षात शहरातील पाणीपुरवठ्याचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करता आले नाही. संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येणे, दुरुस्तीच्या नावाखाली आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा बंद असणे,पाणी न येणे असे प्रकार वारंवार घडत असून हे महापालिकेतील गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपचे अपयश आहे. पुणेकरांच्या या मनस्तापाला केवळ भाजप जबाबदार आहे. २०१७ च्या निवडणुकीपूर्वी 24×7 पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगत भाजप सत्तेत आली. आज प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की २४ तास तर सोडा हक्काचे १ तास सुध्दा पाणी मिळत नाही.
मुळात समान पाणी वाटप योजनेचे काम तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु पाच वर्ष होऊन देखील भाजपलाही काम पूर्ण करता आले नाही. या कामाची झळ आज समस्त पुणेकरांना बसत आहे. पाणीपुरवठ्याचे टॅक्सचे संपूर्ण पैसे घेऊन देखील ३६५ दिवस महानगरपालिका पाणीपुरवठा करत नसेल, तर गेल्या पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामावर ती प्रश्नचिन्ह उपस्थित जात आहे. हा सर्व गलथान कारभार सुरू असताना पुणे शहराचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. आता प्रशासक आल्यानंतर मात्र झोपेतून जागे झालेल्या कुंभकर्ण प्रमाणे ते जागे झाले असून त्यांना अचानकपणे पुणेकरांच्या प्रश्नांची जाण जाणीव होऊ लागली आहे. पुणेकर जनता सुज्ञ असून भाजप कडून सुरू असलेली ही दिशाभूल जनतेने वेळीच ओळखावी. प्रत्येक प्रभागात हिच परिस्थिती असून केवळ लाटेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेल्या कामांवर संकल्पना म्हणून बोर्ड लावण्याचे काम केले आहे याव्यतिरिक्त भाजप नगरसेवकांचे कुठल्याही प्रकारचे कर्तुत्व नाही ” असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

या आंदोलनाच्या वेळी “अहो बापट, काय हे नाटक? सत्तेचे अपयश लपवण्यासाठी कसली ही आदळआपट” , “पाणी देणार होते 24 तास, मात्र पाणी मिळेना आम्हाला धड दोन तास”, “24×7 योजनेचे काय झाले..?” , “गिरीश बापट जवाब दो”, “खासदार साहेब झाली का झोप…?” अशा घोषणा देण्यात आल्या .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...