पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत पहिल्या डावात व्हेरॉक संघाचे वर्चस्व; 22 यार्डस संघाला 150 धावांवर रोखले

Date:

  • हर्षवर्धन पवारची भेदक गोलंदाजी; सुरज गोंड व यश जगदाळे यांची अर्धशतकी खेळी  

पुणे, 3 मार्च 2021: व्हिजन क्रिकेट अकादमी यांच्या वतीने व संतोष मते परिवाराच्या सहकार्याने आयोजित पहिल्या व्हिजन करंडक तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या डावात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने अचूक गोलंदाजी करत 22 यार्डस संघाला 150 धावांवर रोखले व त्यानंतर सुरज गोंड(66धावा) व यश जगदाळे(62धावा) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या दिवशी 62 धावांची आघाडी घेत वर्चस्व राखले.  
व्हिजन स्पोर्ट्स सेंटर, सिंहगड रोड येथील मैदानावर सुरु असलेल्या तीन दिवसीय लढतीच्या सामन्यात आज पहिल्या दिवशी 22 यार्डस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्हेरॉक संघाच्या हर्षवर्धन पवार(50-4), तनु गोटीपटी(9-2), नारायण चौधरी(19-1), टिळक जाधव (8-1), रोहित चौधरी(13-1) यांच्या अचूक माऱ्यापुढे 22 यार्डस संघाचा डाव 38षटकात 150 धावावर कोसळला. सलामीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर प्रज्ञेश बराटेने 42चेंडूत 7चौकार व 1षटकाराच्या मदतीने 41धावा, श्रेयस केळकरने 22धावा, राकेश मतेने 10धावा, आर्शीन देशमुखने 10 धावा काढून थोडासा प्रतिकार केला. 
याच्या उत्तरात व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आजदिवस अखेर 41 षटकात 5बाद 212धावा केल्या. वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्यामुळे व्हेरॉक संघ 7.5षटकात 3बाद 35धावा असा अडचणीत आला. यानंतर फलंदाजीस आलेल्या सुरज गोंड याने संयमी खेळी करत 86 चेंडूत 12चौकारांच्या मदतीने 66 धावा केल्या. सूरजला यश जगदाळेने 62 चेंडूत 8चौकार व 2 षटकारांसह 53 धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 111चेंडूत 115धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. सूरज आणि यश झेलबाद झाल्यावर टिळक जाधव नाबाद  32धावा व ओंकार राजपूत नाबाद 10 धावा करत संघाला 62 धावांची आघाडी मिळवून दिली. 22 यार्डसकडून प्रज्ञेश बराटेने 38धावात 2 गडी बाद केले. 
 संक्षिप्त धावफलक:पहिला डाव: 22 यार्डस: 38षटकात सर्वबाद 150 धावा(प्रज्ञेश बराटे 41(42,7×4,1×6), श्रेयस केळकर 22(43,4×4), राकेश मते 10, आर्शीन देशमुख 10, हर्षवर्धन पवार 13-50-4, तनु गोटीपटी 4-9-2, नारायण चौधरी 4-19-1, टिळक जाधव 5-8-1, रोहित चौधरी 5-13-1) वि.व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 41षटकात 5बाद 212धावा(सुरज गोंड  66(86,12×4), यश जगदाळे 62(53,8×4,2×6), जयेश पोळ  20 टिळक जाधव नाबाद  32(51,5×4), ओंकार राजपूत नाबाद 10, प्रज्ञेश बराटे 8-38-2, नितेश सालेकर 12-42-1, अमन मुल्ला 4-28-1); पहिल्या डावात व्हेरॉक संघाकडे 62 धावांची आघाडी;

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...