Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वॉर्डविझार्डतर्फे वर्षात ४३ हजारांपेक्षा जास्त इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री

Date:

गेल्या वर्षाच्या तुलनेत १३१ टक्क्यांची वाढ

डिसेंबर २०२२ मध्ये ५४०० इलेक्ट्रॉनिक दुचाकी रवाना

वडोदरा – विकासाच्या लाटेवर स्वार होत वॉर्डविझार्ड या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड जॉय ई बाइकच्या उत्पादक कंपनीने २०२२ च्या कॅलेंडर वर्षात (जानेवारी- डिसेंबर २०२२) विक्रीत १३१.६ टक्क्यांची वाढ नोंदवत नव्या वर्षात प्रवेश केला आहे. कंपनीने गेल्या कॅलेंडर वर्षाच्या तुलनेत ४३,९१४ इलेक्ट्रिक दुचाकी युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी जानेवारी आणि डिसेंबर २०२१ दरम्यान कंपनीने १८,९६३ युनिट्सची विक्री केली होती.

उत्पादनांना मिळत असलेली चांगली मागणी आणि देशभरात विस्तारलेले जाळे यांच्या जोरावर कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या ५४०० युनिट्सची विक्री करत ३९.८९ टक्क्यांचा दोन आकडी विकास साध्य केला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये कंपनीने ३८६० इलेक्ट्रिक दुचाकी युनिट्सची विक्री केली होती.

या विकासाविषयी तसेच २०२३ वर्षाबद्दल वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते म्हणाले, ‘२०२२ चे कॅलेंडर वर्ष कंपनीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले, कारण या वर्षात कंपनीने विक्रीचे नवे विक्रम नोंदवले, नव्या क्षेत्रात प्रवेश केला तसेच जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले. आमची दमदार उत्पादन श्रेणी, अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा जगभरातील खरेदीदारांशी मेळ घातला गेला व पर्यायाने गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२२ च्या कॅलेंडर वर्षात तीन आकडी विकास साधणे शक्य झाले. इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब वाढत असतानाच या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील, जुन्या आव्हानांवर मात केली जाईल व अधिक दमदार विकास साधला जाईल अशी आमची अपेक्षा आहे. ग्राहकांसाठी उत्पादन श्रेणीचा आणखी विस्तार करण्याचे आम्ही ठरवले असून कंपनी २०२३ मध्ये नवी मॉडेल्स उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे. त्याचबरोबर या क्षेत्राचा समग्र विकास करण्यासाछी भारतातील पहिले ईव्ही क्लस्टरही विकसित केले जाणार आहे.’

आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीने या आर्थिक वर्षाच्या (एप्रिल ते डिसेंबर २०२२) पहिल्या तीन तिमाहींमध्ये ३० हजार पेक्षा जास्त (३०,४९३) इलेक्ट्रिक दुचाकी युनिट्सची विक्री केली असून गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत झालेल्या १७,३४० युनिट्स विक्रीच्या तुलनेत (एप्रिल ते डिसेंबर २०२२) यंदा ७५.८ टक्के विकास नोंदवला गेला आहे.

२०२२वैशिष्ट्ये (जानेवारी ते डिसेंबर २०२२)
नवी गुंतवणूक–          वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. कंपनीने वडोदरा येथे भारतातील पहिले इलेक्ट्रिक व्हिईकल अँक्सिलियरी क्लस्टर उभारण्यासाठी व पर्यायाने ईव्ही क्षेत्राचा प्रसार करण्यासाठी ४ दशलक्ष चौरस फूट जागा संपादन केली आहे.-          वॉर्डविझार्ड कंपनीने सिंगापूर स्थित अक्षय उर्जा क्षेत्रातील सल्लासेवा कंपनी सुकोनेक्टबरोबस सामंजस्य करार केला असून त्यानुसार वडोदरा येथे लि- इयॉन आधुनिक सेल्सचे उत्पादन केंद्र स्थापन केले जाणार आहे.-          वॉर्डविझार्ड इन्स्ट्रुमेंट्स किंवा सिक्युरिटीज लि-इयॉन सेल्स प्लँट आणि संबंधित पायाभूत सेवांच्या विकासासाठी १५० दशलक्ष डॉलर्स (१२३० कोटी रुपये) उभारणार आहे.-          कंपनीने सिंगापूर येथे आपले पहिले जागतिक आर अँड डी केंद्र सुरू करणार आहे. कंपनीद्वारे आपल्या संपूर्ण मालकीची उपकंपनी वॉर्डविझार्ड ग्लोबल पीटीई लि. अंतर्गत सिंगापूरमध्ये केंद्र आणि जागतिक विक्री कार्यालयाचीही स्थापना करणार आहे.-           
नव्या इलेक्ट्रिक दुचाकी–          वॉर्डविझार्डने वुल्फ+ आणि जेन नेक्स्ट नानू+ यांसह आपल्या हाय- स्पीड स्कूटर्स क्षेत्रात प्रवेश केला आहे.-          पहिली फ्लीट व्यवस्थापन हाय स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी ‘डेल गो’चे लाँच
विक्रीचा नवा उच्चांकनोव्हेंर २०२२ मध्ये पहिल्यांदाच मासिक पातळीवर ७ हजार युनिट्स (७१२३ युनिट्स) डिस्पॅच करण्याचा टप्पा पार
जागतिक विस्तार–          कंपनीने नेपाळमधील महाबीर ऑटोमोबाइल्स या सर्वात जुन्या आणि आघाडीच्या वाहन वितरकांपैकी एका कंपनीशी करार केला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीने आपले कामकाज सुरू केले.
विपणनवॉर्डविझार्ड जून २०२२ मध्ये इंडिया टुर ऑफ आयर्लंडची अधिकृत ‘पॉवर्ड बाय’ प्रायोजक बनली आहे.-           विविध प्रदेशांतील भारतीयांच्या भावना मांडण्यासाठी कंपनीने ‘साथ चले’ या गीतासह #BharatkaJoy हे नवे ब्रँड कॅम्पेन लाँच केले आहे.-          जॉय ई बाइक दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्डस २०२३ ची पॉवर्ड बाय भागीदार बनली आहे. पर्यावरणपूरक पद्धतींविषयी जागरूकता पसरण्यासाठी हे सहकार्य करण्यात आले आहे.
सीएसआर उपक्रम–          जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वॉर्डविझार्डने आपल्या सर्व उत्पादन केंद्रांमध्ये तसेच गुजरातमधील वडोदरा येथे असलेल्या अँक्सिलियरी क्लस्टरमध्ये ‘ग्रीन प्लँटेशन ड्राइव्ह’ राबवले. कंपनीने आणखी १०,००० रोपे लावण्याची आणि जवळच्या परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी विविध प्रकारच्या स्वच्छता मोहिमा राबवण्याची शपथ घेतली आहे.-          गुजरातमध्ये महिला सक्षमीकरण्यासाठी अभियान राबवण्यासाठी वॉर्डविझार्ड फाउंडेशन आणि श्री महाराणी चिमणाबाई स्त्री उद्योगालय एकत्र आले आहेत.
कॉर्पोरेट–          वॉर्डविझार्ड ऑनलूक २०२२ मध्ये ईव्ही क्षेत्रासाठी कंपनीने आखलेल्या योजना सादर-          जॉय र् बाइकची आयक्रिएट या नाविन्यपूर्णतेवर आधारित भारताच्या स्टार्ट अप इनक्युबेटरसह ईव्ही स्टार्ट अप्सना मार्गदर्शन व निधी मिळवून देण्यासाठी धोरणात्मक भागिदारी जाहीर
आर्थिक भागिदारी–          वॉर्डविझार्ड आणि मंगलम इंडस्ट्रीयल फायनान्स लि., आरबीआय नोंदणीकृत एनबीएफसीने भागिदारी केली असून त्याद्वारे खरेदीदारांना सहजपणे ईव्ही खरेदी करता यावी यासाठी वित्तपुरवठा केला जाणार आहे.
ईव्ही एक्सपोझिशनमध्ये सहभाग–          कंपनीने बेंगळुरू येथील इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सपोझिशन २०२२, मुंबईतील इंडिया ऑटो शो ३.०, कोलकातामधील इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सपोझिशन २०२२ आणि पुण्यातील अल्टरनेट फ्युएल कॉनक्लेव्हमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींची संपूर्ण श्रेणी सादर केली होती.-          जॉय ई बाइक ईव्ही इंडिया २०२२ ची टायटल प्रायोजक असून कंपनीने ग्रेटर नॉयडा येथे झालेल्या ईव्ही इंडिया २०२२ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची संपूर्ण श्रेणी सादर केली होती.

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडविषयी

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. ही इलेक्ट्रिक दुचाकी (ईव्ही) क्षेत्रातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असून ती जॉय ई- बाइक्स ब्रँडच्या दुचाकींचे उत्पादन करते. बीएसईवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रातील पहिली नोंदणीकृत कंपनी या नात्याने कंपनीने भारतीय ईव्ही क्षेत्राच्या संभाव्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या तत्वाशी सुसंगत राहात सध्याच्या वाहतूक व्यवस्थेला हरित पर्याय देण्यावर कंपनीचा भर आहे. जॉय ई- बाइक्सच्या माध्यमातून कंपनी नेहमीच्या इंधनांवर चालणाऱ्या बाइक्सना पर्याय उपलब्ध करून देत आहे. कंपनी देशभरातील 25 प्रमुख शहरांत कार्यरत असून ही संख्या आणखी वाढवण्याची योजना आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...