कोरोनाशी लढताना लोकसहभागाचा प्रभाग 13 चा आदर्श – महापौर मुरलीधर मोहोळ

Date:

मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन मुळे प्रभाग 13 तिसऱ्या लाटेशी सामना करण्यास सज्ज

पुणे- कोरोनाच्या संकटाचा सामना करताना सुरुवातीला नेमके कसे लढावे हे कोणाच्याच लक्षात येत नव्हते मात्र त्यातून शिकून दुसऱ्या लाटेचा सक्षमपणे सामना करता आला आणि आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत, हे ह्या लढ्यातील लोकसहभागा मुळे शक्य झाले असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.ह्या लढयात प्रभाग 13 मधील कार्यकर्त्यांचे कार्य आदर्शवत असून नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून प्रभागात विविध ठिकाणी ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटर ची व्यवस्था केल्याने प्रभाग या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असल्याचे ही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने नुकतीच भागीरथी लहान मुलांच्या रुग्णालयात मोफत ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अंजली पाटील, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, भाजप पुणे शहर चिटणीस प्रशांत हरसूले, ह्या प्रकल्पाचे समन्वयक वा प्रभाग 13 चे सरचिटणीस निलेश गरुडकर, ऍड. प्राची बगाटे, स्वीकृत सदस्य ऍड. मिताली सावळेकर, उद्योग आघाडी चे रामदास गावडे वा इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी फाउंडेशन ने केलेल्या कार्याची माहिती दिली. यात विविध माध्यमातून प्रभागात मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, सार्वजनिक ठिकाणी वा काही सोसायट्यामध्ये हँड्स फ्री सॅनिटायझर स्टँड वाटप यासह शहरातील दुर्लक्षित गरजूना किराणा किट, आरोग्य किट वाटप यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात प्रामुख्याने दिव्यांग, मतिमंद, तृतीयपंथी, कीर्तनकार,रुग्णवाहीका चालक,शववा हीका चालक, बॅक स्टेज आर्टिस्ट, लोकाकलावंत, पौरोहित्य करणारे गुरुजी यासह विविध घटकांना किराणा सामान वा इतर मदत करण्यात आली.त्याच मालिकेत मुकुलमाधव फाउंडेशन च्या माध्यमातून प्रभागात विविध ठिकाणी मोफत ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटरची व्यवस्था करण्यात आली असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास सज्ज असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले. डॉ. प्रमोद पाटील यांनी ऑक्सिजन कॉनसन्ट्रेटरचा उपयोग गरजू रुग्णांसाठी करू असे सांगतानाच ह्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. प्रमोद पाटील यांनी स्वागत, निलेश गरुडकर यांनी संयोजन तर ऍड. प्राची बगाटे यांनी आभार प्रदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...