पुणे- जागे व्हा,लाखो लोकांच्या बलिदानाने स्वातंत्र्य आणि लोकशाही चे राज्य मिळालेले आहे त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका ,वाईन विक्रीचा सरकाने घेतलेला निर्णय आपली मुले ,सामाज आणि संस्कृतीवर परिणाम करणारा आहे , त्यास अनेक जन विरोध करत आहेतच पण त्याच प्रमाणे समाजामध्ये अज्ञानाच्या पोटी किंवा जाऊद्या, मला काय करायचे अशा संकुचित वृत्तीने काही जण झोपेत असतील तर त्यांनी जागे व्हावे आणि या निर्णयाला विरोध करण्यासाठी सर्वांनीच हरकती घ्याव्यात असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे . .पुढील काळात सर्व कार्यकर्ते संस्था, संघटना आणि राष्ट्रप्रेम असणाऱ्या सर्व व्यक्ती आपण या निर्णयाला संघटीतपणे विरोध करू या सेही त्यांनी म्हटले आहे.
अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,’27 जानेवारी 2022 रोजी मंत्रीमंडळाने वाईन विक्री संबंधाने जो निर्णय घेतला होता तो निर्णय युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती असल्याने त्या युवाशक्ती, मुले, समाजावर दुष्परिणाम करणारा असल्याने तसेच आमची संस्कृती ही श्रेष्ठ संस्कृती असल्याने त्या संस्कृतीचे रक्षण आणि जतन करण्यासाठी आपण महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना, व्यक्ती, सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींनी या निर्णयाला विरोध करून सरकारला जाणीव करून देण्याचे महत्वाचे कार्य केले. त्याच प्रमाणे समाजामध्ये अज्ञानाच्या पोटी किंवा जाऊद्या, मला काय करायचे अशा संकुचित वृत्तीने जीवन जगणाऱ्या काही लोकांना वाईनच्या संबंधाने जागविण्याचे कार्य केले त्याबद्दल सर्व कार्यकर्ते, संस्था, संघटना, व्यक्ती आणि बंधू भगिनींना धन्यवाद देतो. आणि आभार व्यक्त करतो.
हजारे यांनी पुढे असेही म्हटले आहे,’ तुमच्या या कृतीमुळे 84 वर्षाच्या वयामध्ये मला जनसेवेची नवीन उर्जा मिळाली आहे. नवीन पाठबळ मिळाले आहे. आणि विश्वास निर्माण झाला आहे की, ज्या लोकशाहीसाठी 1857 ते 1947 नव्वद वर्षे लाखो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. पण स्वातंत्र्याच्या 74 वर्षापर्यंत लोकांची लोकांनी लोकसहभागातून चालविलेली लोकशाही काही लोकांनी तिला येऊ दिली नाही. आता मात्र राज्यातील तुमच्या संघटीत कृतीमुळे ती लोकशाही किमान महाराष्ट्र राज्यात तरी येऊ शकेल असा विश्वास निर्माण झाला. आपण प्रतिज्ञा करूया आणि आपल्या लोकशाहीसाठी ज्यांनी बलिदान केले त्यांच्या आत्म्यांना सांगूया की, आम्ही तुमचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यासाठी भलेही आम्हाला पुन्हा बलिदान करावे लागले तरी आम्ही हसत हसत बलिदान करू.पुढील काळात सर्व कार्यकर्ते संस्था, संघटना आणि राष्ट्रप्रेम असणाऱ्या सर्व व्यक्ती आपण संघटीतपणे प्रयत्न करूया.


