पुणे, 19 एप्रिल 2022 – डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित रावतेकर ग्रुप पुरस्कृत अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत साखळी फेरीत प्रतीक वैद्य(3-3 व 6धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर वाडेश्वर विझार्ड्स संघाने सिटीप्राईड सुपरस्टार्स संघाचा 5गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत सलामीच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना सिटीप्राईड सुपरस्टार्स संघाने 6षटकात 4बाद 53धावा केल्या.यात गौरव चाफळकरने 21 चेंडूत 2चौकार व 3षटकारासह 44 धावा करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. वाडेश्वर विझार्ड्स संघाकडून प्रतीक वैद्य(3-3), साकेत गोडबोले 1-8)यांनी सुरेख गोलंदाजी केली. हे आव्हान वाडेश्वर विझार्ड्स संघाने 5.4षटकात 3बाद 55धावा करून पूर्ण केले. यामध्ये कर्ना मेहता 17, श्रीवत्स शेवडे 14, प्रतीक वैद्य नाबाद 6 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी प्रतीक वैद्य ठरला.
याआधी स्पर्धेचे उदघाटन डॉ.अनंतभूषण रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
साखळी फेरी: सिटीप्राईड सुपरस्टार्स: 6षटकात 4बाद 53धावा(गौरव चाफळकर 44(21,2×4,3×6), श्रीनिवास चाफळकर 7, प्रतीक वैद्य 3-3, साकेत गोडबोले 1-8)पराभूत वि.वाडेश्वर विझार्ड्स: 5.4षटकात 3बाद 55धावा(कर्ना मेहता 17(13,1×4), श्रीवत्स शेवडे 14(10), प्रतीक वैद्य नाबाद 6, नीरज कुलकर्णी 1-10, गौरव चाफळकर 1-11);सामनावीर-प्रतीक वैद्य;
अनिल जी.रानडे मेमोरियल डेक्कन जिमखाना क्रिकेट लीग 2022 स्पर्धेत वाडेश्वर विझार्ड्स संघांची विजयी सलामी
Date:

