सायंकाळी पाच वाजेपर्यंत मावळमध्ये ५१.४५ टक्के तर शिरूरमध्ये ४७.१७ टक्के मतदान

Date:

पुणे- : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज  मतदान घेण्यात आले.सायंकाळी पाच वाजेपर्यंत मावळमध्ये ५१.४५ टक्के तर शिरूरमध्ये ४७.१७ टक्के मतदान झाले. 

चार वाजेपर्यंत 41.21 टक्के मतदानाची नोंद झाली. दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

दुपारी 3 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे.

मावळ मतदारसंघातून कर्जत विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 44.60 टक्के मतदानाची नोंद झाली तर शिरूरमधून आंबेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 46.53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या टक्केवारीमध्ये थोडासा बदल होऊ शकतो.मावळ लोकसभा मतदारसंघ 41.30 %

पनवेल 40.90 %
कर्जत 44.60 %
उरण 42.51 %
मावळ 41.73 %
चिंचवड 41.34 %
पिंपरी 37.81 %

शिरूर लोकसभा मतदारसंघ 40.35 %
जुन्नर 43.48 %
आंबेगाव 46.53 %
खेड 42.90 %
शिरूर 41.83 %
भोसरी 41.33 %
हडपसर 31.25 %

राज्यात चार वाजेपर्यंत 41.21 टक्के मतदान

  • नंदूरबार – 50.50 %
  • धुळे 41.31 %
  • दिंडोरी 46.10 %
  • नाशिक 40.28 %
  • पालघर 46.44 %
  • भिवंडी 40.11 %
  • कल्याण 32.35 %
  • ठाणे 36.07 %
  • उत्तर मुंबई 44.66 %
  • उत्तर पश्‍चिम मुंबई 40.52 %
  • उत्तर पुर्व मुंबई 39.95 %
  • उत्तर मध्य मुंबई 38.17 %
  • दक्षिण मध्य मुंबई 39.84 %
  • दक्षिण मुंबई 38.22 %
  • मावळ 41.30 %
  • शिरूर 40.35 %
  • शिर्डी 46.59 %

राज्यात दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के मतदान

  • नंदूरबार – 39.55 %
  • धुळे 30.43 %
  • दिंडोरी 35.23 %
  • नाशिक 27.15 %
  • पालघर 35.61 %
  • भिवंडी 25.38 %
  • कल्याण 19.00 %
  • ठाणे 23.56 %
  • उत्तर मुंबई 32.92 %
  • उत्तर पश्‍चिम मुंबई 30.00 %
  • उत्तर पुर्व मुंबई 30.59 %
  • उत्तर मध्य मुंबई 28.36 %
  • दक्षिण मध्य मुंबई 28.42 %
  • दक्षिण मुंबई 27.13 %
  • मावळ 31.85 %
  • शिरूर 31.37 %
  • शिर्डी 34.79 %

मुंबापुरीच्या तारांगणात मिलिंद देवरा, ऊर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, पूनम महाजन, राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर या उमेदवारांची गर्दी आहे. उद्याच्या टप्प्यात बिहार (5) , झारखंड (3), मध्य प्रदेश (6), ओडिशा (6), उत्तर प्रदेश (13), राजस्थान (13), पश्‍चिम बंगाल (8) या राज्यांतही मतदान होणार आहे. याआधीच्या तीन टप्प्यांत लोकसभेच्या 543 पैकी 303 जागांवरील मतदान पार पडले असून, उद्याच्या टप्प्यानंतर ही संख्या 374 वर पोचेल. लोकसभेची चावी मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील शहाजहॉंपूर, हरदोई, उन्नाव, फारूकाबाद, इटावा, कन्नौज, कानपूर, झाशी व हामीरपूर आदी प्रतिष्ठेच्या जागांवर लढती होतील. सध्या या 13 पैकी डिंपल यादव यांची जागा वगळता साऱ्याच्या साऱ्या जागा भाजपच्या कब्जात आहेत. मात्र, यंदा सप-बसप महाआघाडीमुळे व कॉंग्रेसमध्ये प्रियांका गांधींच्या सक्रिय आगमनाने राज्यातील समीकरणे 2014 प्रमाणे एकतर्फी न राहता लक्षणीयरीत्या बदलण्याची चिन्हे आहेत.

कन्हैया कुमारकडे लक्ष –
बिहारच्या पाचपैकी बेगुसरायची जागा यंदा “हॉट’ सीट मानली जाते ती “जेनयू’चा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्या आगमनाने. भाजपने तेथे गिरिराजसिंह यांना हलविले असले, तरी कन्हैया कुमारने प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेशातील सहा जागांपैकी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ छिंदवाड्यातून व माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंह यांचे पुत्र राहुल सीधीमधून मैदानात आहेत. आपली संपत्ती 660 कोटी दाखविणारे नकुलनाथ हे चौथ्या टप्प्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. या राज्यातील साऱ्या जागा जिंकण्याचा लौकिक कायम ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा व माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी स्वतः सूत्रे हलविली आहेत. मात्र, मालेगाव बॉंबस्फोट खटल्यातील आरोपी व भोपाळच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह या रोजच्या रोज जी मुक्ताफळे उधळत आहेत; त्याचा भाजपला मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे.

…यांचे भवितव्य ठरणार 
मिलिंद देवरा, ऊर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त, पूनम महाजन, राहुल शेवाळे, गोपाळ शेट्टी, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर (सर्व महाराष्ट्रातून), कन्हैया कुमारच्या बेगुसरायपासून माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद (फारूकाबाद), बाबूल सुप्रियो (आसनसोल), विजयंता पांडा (केंद्रापाडा), साक्षी महाराज (उन्नाव), डिंपल यादव (कन्नौज), श्रीप्रकाश जयस्वाल (कानपूर), मानवेंद्रसिंह (बाडमेर), वैभव गेहलोत (जोधपूर) आदी दिग्गजांचे भवितव्य आज (ता. 29) मतदानयंत्रांत बंद होणार आहे.

राज्यातील लढती 
उत्तर मुंबई : ऊर्मिला मातोंडकर (कॉंग्रेस), गोपाळ शेट्टी (भाजप); उत्तर मध्य मुंबई : प्रिया दत्त (कॉंग्रेस), पूनम महाजन (भाजप); वायव्य मुंबई : संजय निरुपम (कॉंग्रेस), गजानन कीर्तिकर (शिवसेना); ईशान्य मुंबई : संजय दिना पाटील (राष्ट्रवादी), मनोज कोटक (भाजप); दक्षिण मध्य मुंबई : एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस), राहुल शेवाळे (शिवसेना); दक्षिण मुंबई : मिलिंद देवरा (कॉंग्रेस), अरविंद सावंत (शिवसेना); ठाणे : राजन विचारे (शिवसेना), आनंद परांजपे (राष्ट्रवादी); कल्याण : श्रीकांत शिंदे (शिवसेना), बाबाजी पाटील (राष्ट्रवादी); पालघर : बळिराम जाधव (बहुजन विकास आघाडी), राजेंद्र गावित (शिवसेना); भिवंडी : सुरेश टावरे (कॉंग्रेस), कपिल पाटील (भाजप); मावळ : पार्थ पवार (राष्ट्रवादी), श्रीरंग बारणे (शिवसेना).

सुरक्षा दलंची परीक्षा 
भाजपला ज्या पश्‍चिम बंगालमधून मोठ्या आशा आहेत; तेथील 8 पैकी 6 जागा सध्या तृणमूलच्या ताब्यात आहेत. ज्या भागांत उद्या मतदान होणार आहे; त्या वीरभूम, पूर्व-पश्‍चिम बर्धमान व मुर्शिदाबाद जिल्ह्यांत निवडणूक काळातील प्रचंड हिंसाचार हा नेहमीचा इतिहास आहे. या स्थितीत उद्याच्या टप्प्यात खरी परीक्षा सुरक्षा दलांसह निवडणूक आयोगाचीच होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पारंपरिक प्रचाराला आधुनिकतेची जोड! बीडकरांची प्रचारात आघाडी; प्रभाग २४ मध्ये फिरू लागले ‘विकासरथ’

पुणे-महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता इच्छुकांच्या नजरा प्रमुख पक्षकांकडून...

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...