मुंब – व्होडाफोनचे प्रीपेड ग्राहक असाल, तर तुम्ही एकत्र असणे चांगले! भारतातील एक आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने आज रेड टूगेदर या अनोख्या आणि सोयीच्या योजनेची घोषणा केली. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या रेड पोस्टपेड योजनेद्वारे एकत्र येता येऊन ग्रुपवरील भाड्यात 20 टक्क्यांपर्यंत खात्रीशीर बचत करता येईल, तसेच 20 जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा मोफत मिळेल.
याशिवाय रेड टूगेदरच्या ग्राहकांना ग्रुपसाठी एकच बिल देण्याची सोयही उपलब्ध होईल. रेड टूगेदर ही योजना केवळ कुटुंबांसाठी मर्यादित नाही, तर ग्राहकांना त्यांचे मित्र आणि त्यांची इतर उपकरणेही या योजनेत एकत्र आणता येतील. 399 रुपये भाडे असलेल्या रेड बेसिक या योजनेपासून सुरू होणा-या कोणत्याही नव्या रेड पोस्टपेड योजनेचे ग्राहक नव्या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
ग्राहकांना त्यांच्या मूळ रेड पोस्टपेड योजनेचे लाभही या जोडीने मिळतच राहतील.
व्होडाफोन इंडियाच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘रेड टूगेदर ही अत्यंत लाभदायक योजना असून, आमच्या ग्राहकांना बचतीची खात्री देणारी आहे. नुकत्याच नव्याने आणलेल्या व्होडाफोन रेड पोस्टपेड योजनांवरही ही योजना उपलब्ध असल्याने व्होडाफोन रेडचे भारतातील सर्वोत्तम पोस्टपेड योजना म्हणून असलेले स्थान आणखी बळकट करणारी आहे.’
रेड टूगेदरशिवाय नव्या व्होडाफोन रेड पोस्टपेड योजनांमध्ये पुढील सुविधा आहेत…
- नॅशनल रोमिंग मोफत असल्याने ग्राहकांना भारतातून भारतात केलेल्या कोणत्याही कॉलसाठी पैसे भरावे लागणार नाहीत.
- डेटा रोल ओव्हर सुविधेमुळे ग्राहकांचा विनावापर पडून राहिलेला डेटा वाया जाणार नाही. विनावापर पडून राहिलेला 200 जीबीपर्यंतचा डेटा त्यांना या सुविधेमुळे नंतरही वापरता येईल.
- नेटफ्लिक्स, व्होडाफोन प्ले आणि मॅगझ्टरच्या माध्यमातून ग्राहकांना 12 महिन्यांपर्यंत सर्वोत्तम मनोरंजनाचा आनंद घेता येईल.
- रेड शिल्ड या हँडसेट सुरक्षा सुविधेमुळे ग्राहकांना हँडसेटची चोरी किंवा नुकसान झाले, तर सुरक्षा कवच मिळेल.
नव्या योजना सध्या आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, तसेच हिमाचल प्रदेश या परिमंडळांमध्ये लागू नाहीत.