मुंबई, 13 नोव्हेंबर 2017 – व्होडाफोन इंडियाने आज अत्यंत कमी किमतीतील व्होडाफोन छोटा चॅम्पियन एकात्मिक व्हॉइस आणि डेटा पॅकची सेवा सुरू केली. व्होडाफोन छोटा चॅम्पियनद्वारे प्रीपेड ग्राहकांना केवळ 38* रुपयांत 28 दिवसांच्या कालावधीसाठी 100 स्थानिक आणि एसटीडी कॉलिंग मिनिटे, तसेच 100 एमबी 3-जी/4-जी डेटा मिळेल.
व्होडाफोन छोटा चॅम्पियनबाबत बोलताना व्होडाफोन इंडियाच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘ग्राहकांना अधिकाधिक सेवामूल्य देण्यासाठी व्होडाफोन सातत्याने नवतेच्या शोधात आहे. व्होडाफोन छोटा चॅम्पियन पॅक हे या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. परवडेल अशा किमतीत पूर्ण महिनाभर कनेक्टेड राहण्याची मुभा देणारी ही अशा प्रकारची पहिलीच एकात्मिक सेवा आहे. ग्राहकांना आणखी लाभ देण्याच्या उद्देशाने आम्ही 100 एमबी डेटाचाही त्यात समावेश केला असून, यामुळे ग्राहकांच्या इंटरनेट प्रवासाची सुरुवात होईल, अशी आम्हाला आशा आहे. आमच्या सर्वोत्तम नेटवर्कवर आता आत्मविश्वासाने कनेक्टेड राहा आणि व्होडाफोन सुपरनेट 4-जी अनुभवाचा आनंद घ्या.’
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, बिहार आणि झारखंड, तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगण या परिमंडळातील व्होडाफोन ग्राहकांना 38 रुपयांत 28 दिवसांसाठी 100 स्थानिक आणि एसटीडी कॉलिंग मिनिट, तसेच 200 एमबी 2जी डेटा मिळू शकेल.
व्होडाफोन छोटा चॅम्पियन पॅक सर्व रिटेल आउटलेट्स, यूएसएसडी, वेबसाइट आमि मायव्होडाफोन एपवर उपलब्ध आहे.
(* किमती परिमंडळानुसार बदलू शकतात.)