5 रुपयां मध्ये संगमवाडी ते महात्मा फुले मंडई प्रवास
पुणे — पुणे महानगर परिवहन महामंडळ योजनेअंतर्गत अतिशय माफक दरात राबविल्या जाणाऱ्या अटल बस सेवा योजनेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज संगमवाडी ते मंडई सेवेचे उदघाटन करण्यात आले .सर्वसामान्य ,गरीब व गरजू प्रवाश्यांना परवडेल आणि गरजेच्या ठिकाणी म्हणजे संगमवाडी ते मंडई या महत्त्वाच्या मार्गावर ही सेवा आजपासून सुरू करण्यात येत आहे . या योजनेसाठी स्थानिक नगरसेविका सौ. सोनाली लांडगे यांच्या पाठपुराव्यातून व प्रयत्नातून पुणे महानगर परिवहन मंडळ लि. यांच्या अटल बस योजना आज सुरू झाली . या मार्गावर कमी प्रमाणात बस सेवा सुरू होती परंतु आता मंडई मध्ये जाणाऱ्या ,लक्षमी रस्त्यावर ,तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर आणि एकूणच मुख्य पुण्यात आणि पेठेत अतिशय माफक म्हणजे अवघ्या 5 रुपयात प्रवास करण्यास नागरिकांना मिळणार आहे .या योजनेचे स्थानिक महिला व ज्येष्ठ नागरिक यांनी स्वागत करून आनंद व्यक्त केला आहे संगमवाडी ते महात्मा फुले मंडई बस मार्गाचे उदघाटन पुण्याचे महापौर मोहोळ व जगदीश मुळीक यांच्या हस्ते आज करण्यात आले. कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक आदित्य मळावे, अभय सावंत, हरीष निकम , सौ. चेतना केरुरे सह व्यवस्थापकीय संचालक पीएमपीएल दत्तात्रय झेंडे वाहतूक व्यवस्थापक पीएमपीएल, संदीप काळे, संतोष लांडगे, सुभाष जेऊर, चंद्रशेखर गव्हाणे, सुरेश गायकवाड,रुपेश सोरटे, व संगमवाडी येथील अनेक नागरिक उपस्थित होते. संगमवाडी येथून पूर्वी ६२ नं. बस संगमवाडी ते मार्केटयार्ड या मार्गे चालू होती. परंतु गेली ६ वर्ष ही बस सेवा बंद असल्याने नागरिकांना रिक्षा किंव्हा स्वतःच्या वाहनाचा वापर करावा लागत होता. याचा त्रास स्थानिकांना होत होता. आता नागरिकांना केवळ 5 रुपयां मध्ये संगमवाडी ते महात्मा फुले मंडई प्रवास करता येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सदर बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांनी नगरसेविका लांडगे व पीएमपीएलचे आभार मानले.

