पुणे-पीएम रिलीफ फंड आणि पीएम केअर्स फंडाला केलेली मदत हीच फक्त कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) असल्याचे ग्राह्य धरले जाणार असून, यातून मुख्यमंत्री सहायता निधीला वगळण्यात आले आहे. केंद्राच्या या निर्णयाचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’, पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत ईमेलद्वारे निवेदन पाठविले आहे.
कोरोनाच्या अभूतपूर्व संकटसमयी केंद्राची मदत आणि राज्याची मदत असा भेदभाव करून राजकारण करणे योग्य आहे का ? कंपन्या, उद्योजक आणि लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केल्यानंतर दोन आठवड्याभराने केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. एकत्रितपणे लढताना संकटापेक्षा राजकारण महत्वाचे आहे का ? हे नेमके का गेले जात आहे , असा संतप्त प्रश्न जिल्हा प्रशासनाला विचारला आहे.

