पद्मा कांबळे पुरस्कृत गटाच्या गंगा धेंडे ‘परिवर्तनाचे दूत पुरस्काराच्या मानकरी

Date:

‘चेंजमेकर्स’ उपक्रमांतर्गत पर्व – ३ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ  संपन्न 
पुणे : ‘स्फुर्ती महिला मंडळ आणि ‘स्माईल’ संस्थेच्या ‘चेंजमेकर्स’ (परिवर्तनाचे दूत) उपक्रमांतर्गत पर्व – ३ स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आज झाला. चेंजमेकर पर्व – ३ मध्ये उल्लेखनीय काम केलेल्या महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला. चेंजमेकर प्रमोटर पद्मा कांबळे पुरस्कृत गटाच्या गंगा धेंडे यांनी ‘परिवर्तनाचे दूत पुरस्कार’ पटकावला.
यावेळी रुपाली पानसरे यांना ‘उद्योगिनी पुरस्कार’, रत्ना नाईक यांना ‘विकासिनी पुरस्कार’, सोनाली गाडे यांना ‘स्वयंसिध्दा पुरस्कार’,  ऊर्मिला गायकवाड यांना ‘शौर्य पुरस्कार’, वर्षा कुंभार यांना ‘स्वावलंबन पुरस्कार’, अनुराधा काळसेकर यांना ‘कलावंती पुरस्कार’ तसेच शीतल कुंभार पुरस्कृत ४ सेवा पुरस्कार देण्यात आले यामध्ये जयश्री घाडगे, स्वप्निल हुन्नूर, सुजाता झुरंगे, प्रणिती आंगरे यांचा सहभाग होता व मृणालिनी वाणी यांना ‘विशेष सहभाग’ पुरस्कारा ने गौरविण्यात आले.
पुरस्काराचे स्वरूप शाल, खासदार निधीतून २ लाख रुपयांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कामाचे सहकार्य देणारे खा. वंदना चव्हाण यांच्याकडून पत्र, चेंजमेकर ग्रुप मधील २ जणांसाठी एम एस सी आय टी मोफत कोर्स चे कुपन, ईश्वर परमार लिखित ‘आनंदाच्या वाटेवर’ पुस्तक आणि स्मृतिचिन्ह असे होते.
यावेळी सर्व चेंजमेकर प्रमोटर ना शाल देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये मृणालिनी वाणी, शीतल कुंभार, रत्ना नाईक, अनुराधा काळसेकर, सोनाली गाडे, उर्मिला गायकवाड, पद्मा कांबळे समावेश होता.
टिळक स्मारक मंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली दाभोळकर यांनी केले. प्रास्ताविक खा. वंदना चव्हाण यांनी केले.
प्रास्ताविकात बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘चेंजमेकर उपक्रम २०१४ मध्ये सुरु झाला. समाजात अनेक समस्या, आव्हाने आहेत. समाजासाठी आणि शहरासाठी आपण देणे लागतो, त्यासाठी झटून काम केले पाहिजे. या उपक्रमात स्वच्छता, साक्षरता मोहीम तसेच अनेकविध उपक्रमांचे आयोजन होते. महिलांना सक्षम, सबल करायचे असेल तर पहिले त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्या तर खऱ्या अर्थाने समाजाला घडवू शकतील. महिला या परिवर्तन घडविणारा (चेंजमेकर) घटक आहे. या उपक्रमामुळे महिलांचे कुटुंबातील स्थान उंचावले आहे. महिलांमधील आत्मविश्वास वाढावा यासाठी विविध उपक्रम चेंजमेकर घेते.’
संजीवनी जोगळेकर आणि चेतना सिंग यांनी या उपक्रमात महिलांना सहकार्य केले.
संजय कुंबरे, साक्षी कुंबरे यांचे स्पर्धा उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य लाभले.
सनत परमार, दर्शना परमार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, रुपाली चाकणकर (महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर), माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, वैशाली बनकर (माजी नगरसेविका), माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, नंदा लोणकर, विजया कापरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, चेंजमेकर्स ग्रुप सदस्या, उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर तृतीयपंथीय ऋषीका शर्मा हीने कोरियोग्राफ केलेला ‘रॅम्प वॉक’ कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. 
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी ‘कजरा मोहोब्बतवाला’ हा मानिनी गुर्जर आणि सहकारी यांचा द्वंद्व महिलांनी सादर केलेला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मानिनी गुर्जर या स्माईल संस्थेच्या फॅशन डिझायनर आहेत.
किमया काणे (की बोर्ड), संपदा देशपांडे (हार्मोनियम), उमा जटार (व्हायोलिन), भावना टिकले (तबला), शिल्पा आपटे (ढोलकी), उर्मिला भालेराव (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमाचे निवेदन रंजना काळे यांनी केले. महिलांनी उत्स्फुर्तपणे या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
विकासिनी पुरस्कार
प्रदान रत्ना नाईक
कार्य: १. हजारो शाडूच्या मातीपासून गणपती बनविणे शिकवले
२. देवदासींच्या मुलांसाठी अलका गुंजनाळ ह्यांच्या बरोबरीने मुलांची जबाबदारी घेतली, नवरात्रात स्वतःच्या घरी या मुलांना बोलाविले, त्यामुळे तीची माहिती परदेशात आपल्या सहकारी शलाका सोमण ह्यांनी कळविल्याने रुपये ५००० देणगी परदेशातून मिळाली ज्याचा विनियोग ह्या मुलांसाठी करण्यात आला.
३. विविध १० वोर्कशॉप्स रोटरी साठी घेतली
सेवा पुरस्कार १
प्रदान जयश्रीताई घाडगे
कार्य : १. हडपसर पुढार वस्ती, भिलारवाडी, आंबेगाव येथील नोकरी नसलेल्या D.Ed, B.Ed असलेल्या शिक्षकांना नाममात्र पगार देऊन प्रशिक्षित करून रस्त्यावरील विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवतात
२. Good Touch, Bad Touch, परीक्षांच्या ताणाचे व्यवस्थापन या सर्व विषयांवर सेवा वृत्तीने ज्ञान दान करतात
सेवा पुरस्कार २
प्रदान स्वप्निल हुन्नूर
कार्य: १. ममता बाल सदन मधील अनाथ मुलींबरोबर दिवाळी साजरी केली
२. जुने कपडे गोळा करून त्यांची प्रतवारी, Laundryकरून शहरातील गरिबांना वाटप
३. शिवजयंती घराघरात शिवराय मनामनात हा उपक्रम महाराष्ट्र राज्य भर राबविला
सेवा पुरस्कार ३
प्रदान सुजाता झुरंगे
कार्य: १. १० महिला, टेम्पोवाले, PDCC बँक ह्या सर्वांना जोडून घेऊन रुपये दहा लाखांची विक्री केली
२. फराळाच्या पदार्थांचा लघु उद्योग सुरु केला आहे
सेवा पुरस्कार ४
प्रदान प्रणिती आंगरे
कार्य: १. थॅलिसिमियावर काम करणाऱ्या २५० रक्त दात्यांची गट बांधणी केली
२. माजी विध्यार्थी संघटना निर्माण केली
सायंसिद्धा पुरस्कार
प्रदान सोनाली गाडे
कार्य: १. गावरान खाद्य महोत्सव वैशिष्ठ्यपुर्ण पद्धतीने भरवते
२. कागदी पिशव्या बनविणे PDCC बँके मार्फत गावोगावी शिकवले
३. विधवांचे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले
४. चांदणी ह्या तृतीयपंथी मार्फत स्व स्वरंक्षण शिकवले
विशेष सहभाग पुरस्कार
प्रदान मृणालिनी वाणी
कार्य: १. बॉक्सिंग मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मुलांच्या आई वडीलांचा सत्कार
२. कॅन्सरची चाचणी आणि त्यांच्यातील कॅन्सर पेशंट वर उपचारास मदत
३. संपूर्ण वाणी कुटुंब क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देते
शौर्य पुरस्कार
पुरस्कार प्रदान -ऊर्मिला गायकवाड
कार्य-  सुतारदरा परिसरात भाजी विक्री करणारयांकडून हप्ता वसूल करणारयांना जरब बसवली,गैर प्रकार बंद पाडले,कोणत्याही असहाय्य महिलेच्या हाकेला धावून जाणारा गट,  विशेष त्रितुय पंथीयांची माय, शाळेत मुलींसाठी  कराटे शिक्षण,रोजगार निर्मितीसाठी कागदी पिशव्या, कचरा सफाई हे  ऊपक्रमही घेतले.
नमस्कार
पुरस्कार १प्रमोटर पद्मा
चेंजमेकर पुरस्कार प्रदान गंगा धेंडे
कार्य-आदरणिय वंदनाताईंनी सुरू केलेल्या साक्षरता अभियानात लहानपणापासून सहभागी .पर्व ३ मध्ये निगडी परिसरात ऊल्लेखनिय बदल घडवून आणण्यासाठी एकजूटीने गणेश मंडळ,७ मजली ईमारत लहान मुले चकाचक करतात, कचरा साफ करून सुंदर रस्ता त्यावर गरबा,सीसीटीव्ही कॅमेरे वापर.गुटखा पुड्यांची होळी,बिर्ला हॉस्पीटलच्या डॉक्टरांच्या मदतीने आरोग्याची काळजी ,सवयी यावर जनजाग्रुती.
पुरस्कार २ प्रमोटर पद्मा
ऊद्योगिनी पुरस्कार प्रदान-  रुपाली पानसरे
आळंदी परिसरात रोजगार निर्मितीसाठी खास प्रशिक्षणे कागदी पिशव्या, मोत्याचे दागिने,परकर शिवणे.यातून महिलांना रोजगार चालू झाले.भीमथडी प्रदर्शनात सहभागी होऊन चांगला व्यवसाय वाढविला
पुरस्कार ३ प्रमोटर म्रुणालिनी वाणी
विशेष ऊल्लेखनिय पुरस्कार प्रदान
स्पोर्टस साठी स्वत:आणि संपूर्ण कुटुंबाने मदत करण्याखातर.
पुरस्कार ४
स्वावलंबन पुरस्कार प्रदान  – वर्षाराणी कुंभार
कार्य- महिलांना नोकरीऐवजी पैसे मिळण्याचे पर्याय शिकवले.५० महिला चारचाकी गाडी चालवू लागल्या.नर्सिंग ब्युरो चालवू लागल्या,जुन्या साड्यांच्या पिशव्या शिवून विकू लागल्या.आरोग्याची तपासणी,सफाई,शेतकरी मेळावा घेणे असेही त्यांनी ऊपयुक्त ऊपक्रम घेतले.
कलावंती पुरस्कार प्रदान  – अनुराधा काळसेकर
कार्य – सुयोग्य वेळा निवडून सर्व हरवलेल्या किंवा विसरत चाललेल्या कला पुनरुज्जीवित करण्यासाठी पुढाकार.मोदक,चिक्की ,वेगवेगळे लाडू, राख्या,तोरणे,शाडू मातीचे गणपती शिकवणारया कलाकारांकडून या कलावंती दूताने सर्वांना अेकत्र आणले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेस वाडिया कॉलेज, सीओईपी टेक आणि निकमारचे दमदार विजय

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे...

धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी सर्वच समाजाची फसवणूक करून फडणवीसांनी राज्यात जातीय संघर्ष पेटवला

ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी, जिल्हा परिषद, पंचायत...

अमेरिकेच्या धमकीनंतर 7 देशांचे सैनिक ग्रीनलँडमध्ये पोहोचले

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या धमक्यांनंतर...