पुणे-पुण्यातील राष्ट्रीय स्तरावर सुप्रसिद्ध असलेले विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांच्या “नेताजींच्या मृत्यूचे गूढ…भारताचे सर्वात मोठे रहस्य” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कुसुमाग्रज वाचन कट्टा, अक्षरधारा बूक गॅलरी, बाजीराव रोड येथे ता. ११-३-२०१६ रोजी संध्याकाळी ६ वाजता संपन्न झाला. मूळ इंग्रजीत असलेल्या “इंडियाज बिगेस्ट कवर-अप” या वितास्ता पब्लिशिंग प्रकाशित आणि अनुज धार लिखित या पुस्तकाचा “नेताजींच्या मृत्यूचे गूढ…भारताचे सर्वात मोठे रहस्य” हा मराठी अनुवाद आहे. या प्रसंगी श्री. आनंद हर्डीकर आणि डॉ. मीना शेटे – संभू यांनी श्री. अनुज धर यांची मुलाखत घेतली.
अनुज धर हे पत्रकार आणि लेखक असून दिल्ली येथील “मिशन नेताजी” या संस्थेचे संस्थापकीय विश्वस्त आहेत. या संस्थेद्वारे २००१ पासून नेताजीं नाहीसे होण्यामागचे रहस्य सोडविण्याचा प्रयत्न चालू आहे. तैपेई येथे १९४५ रोजी झालेल्या एका कथित विमान अपघातात नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणाची शहानिशा करताना त्यांनी शेकडो कागदपत्रांचा अभ्यास केला.