‘विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ला (व्हीआयटी) ‘युनायटेड नेशन्स सेंटर, आयएआरसी, मुंबई’तर्फे नुकताच ‘बेस्ट कॉलेज इन इंडिया’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘रिओ+२२ युनायटेड नेशन्स डिकेड ऑफ सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल इंडिया प्रोग्रॅम’ या कार्यक्रमात या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. हा कार्यक्रम ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ने (यूएनसीएसडी) प्रायोजित केला होता. ‘आयएआरसी सेंटर, मुंबई’ने संस्थेला सुवर्णचिन्ह व मानपत्र देऊन गौरवले.
हे कार्यक्रम ‘यूएनसीएडी’ राबवत असलेल्या शाश्वत विकास दशकासाठीच्या धोरणाचा भाग असून त्यांचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये जागतिक पर्यावरणविषयक समस्यांबाबत जागृती निर्माण करण्याचा, त्यांची भूमिका व जबाबदारी यांची जाणीव करुन देण्याचा, तसेच शाश्वतता व चिरंतन विकासाच्या तत्त्वांबाबत आकलन घडवण्याचा आहे. या मालिकेतील पुढचा कार्यक्रम रिओ+२३ असून त्याचे नामकरण ‘वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन समिट 2016 प्रोग्रॅम’ असे आहे, ज्यात व्हीआयटी अधिक चुरशीने व उत्साहाने सहभागी होणार आहे. “आजचे तरुण जागतिक पर्यावरणविषयक समस्यांबाबत किती जागरुक आहेत आणि जागतिक तापमानवाढ, ओझोन थर विरळ होणे, हरितगृह वायू उत्सर्जन यांसारख्या गंभीर व आव्हानात्मक समस्यांवर उपाय शोधून काढण्यात आपल्या जबाबदारीबाबत किती सूज्ञ आहेत, हे उद्योगजगत पाहात आहे”, असे ‘व्हीआयटी’चे व्यवस्थापकीय विश्वस्त भरत अगरवाल यांनी बोलून दाखवले.
‘व्हीआयटी’चे संचालक प्रा. डॉ. राजेश जालनेकर म्हणाले, की शाश्वत ऊर्जा व अन्य क्षेत्रांत आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहोत. आमचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा गौरव व प्रशंसा झाल्याचे पाहून मला अत्यंत आनंद झाला आहे.
‘व्हीआयटी’च्या रसायन अभियांत्रिकी विभागातील डॉ. श्रीकांत कुलकर्णी हे आजपर्यंतच्या, तसेच येथून पुढे राबवल्या जाणाऱ्या या कार्यक्रमांचे समन्वयक व मार्गदर्शक म्हणून कामगिरी बजावत आहेत. या कार्यक्रमांसाठी मोलाचे योगदान देऊन त्यांची समृद्धी घडवणाऱ्या भारतीय व आंतरराष्ट्रीय विद्वानांमध्ये डॉ. कुलकर्णी यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी लिंक : (http://www.iarc.res.in/rio/


