पुणे -सरहद संस्थेने आयोजित केलेल्या पहिल्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथ दिंडीने झाला. दिल्ली येथून निघालेली ग‘ंथ दिंडी पुण्यामध्ये आली. आणि शुक‘वारी सकाळी टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेपासून वाजत गाजत निघालेल्या दिंडीची सांगता संमेलनासाठी झाली.
गं‘थदिंडीने सहभागी असणार्या बसमध्ये २२ भाषातील ग्रंथ ठेवण्यात आले होते. तसेच दिंडीत सरहद संस्था संचालित शाळेतील विद्यार्थी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरजितसिंग पाथर, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास आमरे, श्री. किरण जितसिंग, संजय नहार, भारत देसडला, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी, जेष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, डॉ. अशोक कामत, आरपीए सेहगल, संतसिंग मोखा, चरणजितसिंग सहानी, दलजितसिंग रंक आदि सहभागी झाले होते. ही ग‘ंथदिंडी थोर समाजसेवक बाबा आमटे यांना समर्पित करण्यात आली आहे. ‘भाषा अनेक-देह एक’ ही संकल्पना ग‘ंथदिंडीव्दारे मांडण्यात आली.
ग‘ंथदिंडी टिळक रोड मार्गे नेहरु स्टेडियम जवळील गणेश कला क‘ीडा मंच येथे आली. तेथे दिंडीचे पाहुण्यांच्या वतीने उत्साहात स्वागत आणि दिंडीतील ग‘ंथाचे पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे तेथे वाघांच्या तालावर भांगडा नृत्याचा आनंदही पाहुण्यांनी घेतला.
संयोजक श्री. संजय मल्हार यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मराठी व पंजाबी भाषेचे नाते संमेलनामुळे दृढ होणार असल्याचे सांगितले. यावेळी सर्वश्री डॉ. विकास आमटे, डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. मिलींद जोशी, रामदास फुटाणे, वैभव वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने….
Date:

