उरुळी देवाची गावाला पाणीपुरवठा सुरू करा– अतुल बहुले.
पुणे -लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणी सुरू होत नाही . मंतर वाडीत पाणी येते परंतु उरुळीत पाणी नाही .सध्या कोरोणाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकर का होणारी गर्दी टाळून पाइपलाइन ने पाणी सरू करावी अशी मागणी भारिप चे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी केली आहे . उरुलीत सद्या टँकर जवळ मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाणी भरण्यासाठी होते. या मुळे कोरोणा चां प्रादुरभाव होण्याचा धोका नाकारण्यात येवू शकत नाही.
ऊरूळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगर पालीकेच्या वतिने करण्यात आलेला आहे.शिवाय तीन दशलक्ष लिटर ची पाण्याची टाकिही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे .
कचराडेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या प्रमाणे ऊरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही. सद्याची परिस्थिती करोनामुळे गंभीर आहे.पुण्यातील वाढता कोरोना चा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोणा ला थांबवू शकतो .त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे .
तरी टॅंकरवर पाणी भरणे धोक्याचे आहे, यामुळे लोकांन्ना कोरोनाची लागण होवु शकते.
त्वरित नलीकेद्वारे पाणी ग्रामस्थांना सुरु करणेत यावे. अशी मागणी अतुल बहुले यांनी पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे

