पुणे(अनिल चौधरी)-
पुणे जिल्ह्यात विविध सामाजिक कार्ये करणाऱ्या विशाखाताई गायकवाड यांना “ पत्रकार संरक्षण समिती “ तर्फे राज्यस्तरीय “ आदर्श महिला रत्न“ हा पुरस्कार पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला.
पत्रकार संरक्षण समिती तर्फे पनवेल येथे पहिला राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते . विविध क्षेत्रातील सामाजिक ,वैद्यकीय , उद्योगक्षे
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना विशाखाताई म्हणाल्या आजचा दिवस माझ्यासाठी खुप आनंदाचा आणि महत्वाचा आहे.स्त्री जेव्हा समाजकार्यात येते तेव्हा तीला स्वताला सिद्ध करायला मोठा संघर्ष करावा लागतो.पावलोपावली येणाऱ्या समस्या व् अडचणींचा सामना करत काम चालु ठेवावे लागते.आणि जेव्हा अचानक आपण केलेल्या कामांची कोणी दखल घेत तेव्हा सर्व संकट छोटी वाटू लागतात.आज पत्रकार संरक्षण समितीचा राज्यस्तरीय –२०१६-“आदर्श महिला रत्न“पुरस्कार मला मिळाला.
या पुरस्काराने माझी जबाबदारीही वाढली असून आता कामाला नवा उत्साह मिळेल. ज्याप्रमाणे एखाद्या यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे माझ्या ह्या यशाच्या मागे माझे पती संदीप गायकवाड यांनी समाजकार्य करत असताना वेळोवेळी दिलेली मोलाची साथ,आधार आहे म्हणूनच तर आज अनेक सामजिक संस्था मार्फत काम करत आहे.
पत्रकार संरक्षण समितीचे सर्व मान्यवर सदस्य ,खास करून पुणे जिल्हा अध्यक्षमा अनिल चौधरी सर व मा चंद्रकांत जगधने भाऊ या सर्वांचे मनापासून खुप खुप आभार.
याप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर , न्यूज नेशन चे चीफ एडिटर सुभाष शिर्के , रेडीओ आर जे रेड एफ एम ची आर जे श्रुती कुलकर्णी ,रेडिओ मिर्ची चे आर जे सुमित कृषी अधिकारी प्रीतमसिंग राजपूत , पुणे जिल्हा नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक बाळासाहेब अढागळे ,महाडचे तहसीलदार संजय पाटील , प्रदेश अध्यक्ष नंदकिशोर धोत्रे , सचिव विजय सूर्यवंशी ,प्रदेश प्रसिद्धी प्रमुख अनिल चौधरी , , राष्ट्रीय अध्यक्ष अशोक मात्रे , उपाध्यक्षा अमिता चौहान, रूपा सिंघ , आत्माराम तांडेल , सुरज देवताळे ,मदन पाटील , डॉन के के , यशवंत पवार , अमोल मराठे , जयवंत पाटील आदी उपस्थित होते .