मोबाइल फोनच्या स्क्रीनवर घुटमळणाऱ्या आजच्या जगात, खरे अनुभव अभावानेच मिळतात. अशा वातावरणात विनोद दोशी नाट्यमहोत्सव नाटकाची संस्कृती जिवंत ठेवत आहे. प्रख्यात उद्योगपती आणि कलाप्रेमी विनोद दोशी यांच्या स्मृत्यर्थ सुरुवातीला या महोत्सवाची सुरुवात झाली. ह्या महोत्सवात एक दशक भारतातील उत्तमोत्तम नाटकं माचीत केली गेली. पुण्यात आयोजित होत असलेला हा महोत्सव आता दहाव्या वर्षात आहे आणि आजही तो सर्वोत्तम आहे.
गेल्या दशकात, महोत्सवात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, पंजाबी भाषेतील आणि काही गैर-भाषिक नाटकं सादर केली गेली. विजय तेंडुलकर, मोहन राकेश, इस्मत चुगताई, गिरीश कार्नाड, सई परांजपे, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, कुमुद मिश्रा, रघुबीर यादव, पल्लवी अरुण, सुनील शानबाग आणि इरावती कर्वे यांसारख्या महान कलावंतांना येथे स्थान मिळालं आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे भारतातील सर्वोत्कृष्ट नाटकं गजब कहाणी, उणे पुरे शहर एक, सिंधू सुधाकर रम आणि इतर, विनोद दोशी नाट्यमहोत्सवात सादर झाली. हे ऐतिहासिक वर्ष साजरं करण्यासाठी, यावर्षी उत्सव जुन्याची आठवण आणि भविष्याबाबतची आश्वासनं घेऊन येत आहे.
या वर्षी महोत्सवाची सुरुवात सतीश आळेकर लिखित व दिग्दर्शित ‘महानिर्वाण’ ह्या नाटकाने होणार असून हे नाटक महोत्सवासाठी खास निर्मिती आहे. ह्यापूर्वी हे नाटक १० वर्षापूर्वी थियेटर अकादमी ने सादर केले होते तर ह्या वर्षी (२०१८) मध्ये नाटक कंपनी ते सदर करीत आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तमाशा थियेटर प्रस्तुत व सुनील शानबाग दिग्दर्शित ‘Words have been uttered’ हे वेगळ्या धाटणीचे नाटक सादर होत आहे. हे नाटक सांस्कृतिक अभिव्यक्तीचा उपयोग करून साम्राज्याचा किंवा राजवटीचा निषेध ह्यापूर्वी कसा केलाय ह्याचा आढावा घेते. तिसऱ्या दिवशी पूर्वा नरेश ह्याचं लिखित दिग्दर्शित हिंदी संगीतिका – बंदिश २०-२०,००० हर्ट्झ हे सादर होणार आहे.
२२ तारखेला नवी दिल्लीच्या कठकता ह्या संस्थेचे ‘महाभारत’ एका वेगळ्या दृष्टीकोनातून सादर होईल. हे नाटक अनुरूपा रॉय दिग्दर्शित असून त्यात त्यांनी बुनराकू ह्या जपानी कठपुतळी कलेचा उपयोग केला आहे. १० व्या महोत्सवात शेवटी गिरीश कर्नाड लिखित ‘ययाती’ हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. हे नाटक बेंगळूरू मधील जाग्रीती थियेटर च्या अरुंधती राजा ह्यांनी दिग्दर्शित केले आहे व ययाती ह्या नाटकाचा इंग्रजी प्रयोग प्रथमच पुण्यात सादर होणार आहे.
हा महोत्सव १९ फेब्रुवारी २०१८ पासून २३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे संपन्न होईल. यापूर्वी पुणे, मुंबई, बंगळुरू, नवी दिल्ली, कोलकाता, जयपूर, कणकवली आणि इम्फाळ यासारख्या ठिकाणांहून आलेल्या विविध भाषिक नाटकांमुळे हा महोत्सव महाराष्ट्रातील सर्वसमावेशक नाट्यमहोत्सव ठरतो.
विनोद अँड सरयू दोशी फाउंडेशनच्या सरयू दोशी म्हणाल्या, “विनोद दोशी नाट्य महोत्सवाचा १०वा वर्धापन दिन साजरा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. फाउंडेशनमध्ये हे सर्व आमच्यासाठी अतिशय जवळचे आहे. गेल्या दशकात, आम्ही या महोत्सवाप्रती वाढता उत्साह पाहिला आहे जो केवळ नाटकांच्या गुणवत्तेमुळेच नव्हे तर कलाक्षेत्रातल्या तरुणांच्या वाढत्या सहभागामुळेही आहे. अभिव्यक्ती आणि कार्यक्षमतेसाठी हे एक व्यासपीठ आहे ज्यासाठी आम्ही अथक काम केलं आहे. खूप प्रेमाने, आम्ही पुण्यातील लोकांसाठी ५ दिवसांचा केवळ नाटकांचा नव्हे तर जीवनाचाच उत्सव आयोजित करत आहोत !”
महोत्सवाचे संचालक श्री. अशोक कुलकर्णी पुढे म्हणाले, “हे एक अगदी विशेष दशक आहे. खास दशकपूर्तीसाठी ह्या वर्षी नाट्यमहोत्सवात आम्ही दोन अभिजात नाटकं पुनरुज्जीवित करत आहोत – एक मराठी आणि एक कन्नड, पूर्णत: नवीन प्रेक्षकांसाठी. ‘ययाति‘ – १९६० च्या दशकात गिरीश कार्नाडांचं हे अभिजात नाटक, प्रथमच पुण्यात उभं राहील. ज्यांनी आम्हाला खूप वर्षांपासून खूप प्रेम दिलं त्या आमच्या प्रेक्षकांसाठी ही आमची खास भेट आहे. या उत्सवातला माझा आवडता भाग म्हणजे नाट्यप्रयोगानंतर कलाकार आणि प्रेक्षकांमधील अनौपचारिक संवाद. खुला संवाद चालू ठेवणं ही विनोद दोशी नाट्य महोत्सव करण्यामागची एक भावना आहे.”
हा नाट्यमहोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच आहे. इतर शहरातूनही लोक पुण्याला ह्यासाठी येतील. जर तुम्हाला जुन्या आणि नव्या जगात सैर करून यायची असेल आणि जर इतर नाट्यरसिकांना भेटून तुम्ही उत्साहित होत असाल, तर सरळ विनोद दोशी नाट्य महोत्सवाला या. प्रत्येकासाठी इथे काहीतरी आहे!
वेळापत्रक
दिवस | तारीख आणि वेळ | नाटक | भाषा | संस्था | दिग्दर्शक |
सोम | १९ फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. | महानिर्वाण | मराठी | नाटक कंपनी, पुणे | सतीश आळेकर |
मंगळ | २० फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. | वर्ड्स हॅव बीन अटर्ड | उर्दू / हिंदी / इंग्रजी / पंजाबी | तमाशा थिएटर, मुंबई | सुनील शानबाग |
बुध | २१ फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. | बंदिश २० हर्ट्झ – २०००० हर्ट्झ | हिंदी | आरंभ, मुंबई | पूर्वा नरेश |
गुरु | २२ फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. | महाभारत | हिंदी / इंग्रजी | कटकथा पपेट आर्टस्, नवी दिल्ली | अनुरूपा रॉय |
शुक्र | २३ फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. | ययाती | इंग्रजी | जागृती थिएटर, बंगळुरू | अरुंधती राजा |