पुणे-ग्रामपंचायत आंबी बुद्रुक बारामती येथील ग्रामपंचायत निवडणूकीत झालेल्या गैरप्रकार व बँलेट EVM मशिनमध्ये गडबडीमुळे ग्रामपंचायत आंबी ब्रुद्रुकची फेर निवडणूक घेण्यात येवून तसेच तेथील निवडणुका केंद्रअध्यक्षाची चौकशी करावी.अशी मागणी निवासी जिल्हाआधिकारी राजेंद्र मुठे यांच्याकडे करण्यात आली आहे . श्रीहनुमान सर्वधर्म जनविकास पँनलच्या वतीने ग्रापंचायत सरपंच पदाचे निवडणूक उमेदवार तुषार चिंतामन तावरे तसेच उमेदवार अतुल मारुतराव गायकवाड आणि दिंगबर खोमने यांनी निवडणूक केंद्रअध्यक्ष गायकवाड सी.बी. यांनी उमेदवार व प्रतीनिधी समोर EVM मशिन चेक करुन सह्या करुन सिल केलेली मशिन मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावर पोहचल्या नंतर रात्री परस्पर त्याचे सिल काडून बदलून ती खराब असल्याने बदलली आहे व गोडबोलून बदल अर्जावर सह्या घेतल्या. अशी तक्रार मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी केली आहे .