पुणे-मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने नवी सांगवी येथे मतदान जनजागृती केली.
संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संचालक आण्णा जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ७ वाजता जिजामाता गार्डन नवी सांगवी येथुन प्रभात फेरीव्दारे मतदान करणे हे लोकशाही बळकटी बरोबरच शहराच्या विकासाकरीता सामाजिक जाणीव प्रश्नाची जान असणारा लोकप्रतीनिधीला निवडुन देण्यासाठी प्रत्येक नागरीकाने मतदान केलेच पाहीजे .
एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो!!!. मतदानानिमित्त सुट्टी आहे या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया!!! हे विचार म्हणजे नाकर्तेपणाचा कळस होतात. पण थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे एका-एका मतानेच मतांचा डोंगर उभा राहतो. यामुळे प्रत्येक व्यक्तीने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त होतो ही बाब गांभिर्याने लक्षात घ्यायला हवी.
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ओसंडून वाहते. याचपद्धतीने ध्वजदिन निधी संकलनासही जनता सढळहस्ते मदत करते. नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्धजन्य परिस्थिती, प्रत्येक भारतीय नागरिक देशप्रेमाने भारावून जाऊन मदतीसाठी पुढे सरसावतो व आपल्या परिस्थितीनुसार मदत करतो. त्याच प्रमाणे मतदानाबाबतही लोकांच्या मनात अशी कर्तव्यभावना चेतविण्याची नितांत गरज आहे.असे मत शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी व्यक्त केले.यावेळी
*ना जातीवर ना धर्मावर, बटण दाबा कार्यावर
*मताची किंमत नाही घेणार, मात्र मत जरूर देणार
*जो दारू, साड्या, नोटा वाटणार, त्याला मतापासून दूर ठेवणार.
*राखतो मातृभुमिची शान, करितो आम्ही मतदान.
अशा घोषणांनी जनजागृती साठी देण्यात आल्या . यावेळी संस्थेचे पदाकारी संगिता जोगदंड , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतिश लालबिगे , कवयत्री संगिता झिंझूरके, शहर उपाध्यक्ष विकास शाहाणे व पिंपरी चिंचवड कमिटीचे सर्व पदाकारी , सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीकांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता

