नवी दिल्ली- देशाबाहेर पळून गेलेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अवमान प्रकरणी 4 महिने तुरुंगवास व 2 हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. २०१७ मधील एका खटल्यात आदेश देऊनही जाणूनबुजून माहिती लपवणे आणि अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज सोमवारी ११ जुलै २०२२ रोजी विजय मल्ल्या याला चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. त्याबरोबर दोन हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले.
विजय मल्ल्यांना 4 महिन्यांचा तुरुंगवास आणि 2 हजारांचा दंड
Date:

