समाजातील गरजू, नोकरदार, कष्टकरी कुटुंबांना १६० शाडूच्या गणेश मूर्ती
पुणे : मागील दोन वर्षात बदललेली परिस्थिती आणि कोविडसारखी संकटे यामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. समाजातील गरजू, नोकरदार, व्यावसायिक व कष्टकरी वर्गाला दोन वेळेचे नीट खायचे मिळण्याची भ्रांत असताना घरात गणेशोत्सव साजरा कसा करणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे अशा कुटुंबांवर आलेले संकट दूर व्हावे, याकरीता ग्राहक पेठेतर्फे विघ्नहर्ता गणेशाची ; मूर्ती आमची किंमत तुमची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ग्राहक पेठेच्या टिळक रस्त्यावरील मुख्य शाखेत या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. समाजातील विविध घटकांचा कृतज्ञता सन्मान करण्याकरीता मागील वर्षी असा उपक्रम आयोजित केला होता. पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, बँड वादक, पुरोहित यांनी या केंद्रामध्ये येऊन आवडेल ती गणेशमूर्ती घ्यावी आणि त्याची स्थापना या उत्सवात घरी करावी, ही यामागील संकल्पना होती. यंदा गरजू, नोकरदार व कष्टकरी वर्गाकरीता ज्यांच्याकडे उत्सव साजरा करण्याकरीता पुरेसे पैसे नाहीत, त्यांना ग्राहक पेठ ही शाडूची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती किंमत तुमची मूर्ती आमची या उपक्रमांतर्गत देत आहे, असे ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक यांनी सांगितले.
विघ्नहर्ता गणेशाची ; मूर्ती आमची किंमत तुमची:ग्राहक पेठेचा उपक्रम
Date:

