थायलंडला नमवून व्हिएतनामने विश्वचषक प्रवेशाच्या आशा कायम राखल्या

Date:

नवी मुंबई ०२ फेब्रुवारी २०२२ : एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या प्ले ऑफ लढतीत व्हिएतनामने थायलंडचे कडवे आव्हान २-० गोलने परतावले. या शानदार विजयासह व्हिएतनामने २०२३ साली ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पधेर्ची पात्रता मिळवण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. व्हिएतनामला पात्रता मिळवण्यात यश आले, तर विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच त्यांचा सहभाग होईल.
डी. वाय. पाटील स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या सामन्यात व्हिएतनामने नियोजनबद्ध खेळ करत बाजी मारली. रविवारी होणाऱ्या प्ले ऑफ लढतीत व्हिएतनामने चायनिज तैपईला नमवले, तर फिफा विश्वचषक स्पर्धेतील दक्षिण आशियाई देशांचे स्थान स्पष्ट होईल. याआधीच चायना पीआर, जपान, कोरिया रिपब्लिक , फिलिपाईन्स आणि सह-यजमान ऑस्ट्रेलिया यांनी विश्वचषक स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे. त्याचवेळी, थायलंडला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्याच्या आशा कायम राखण्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात चायनिज तैपईविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य असेल. जर थायलंड पराभूत झाले, तर त्यांना इंटर-कॉन्फेडरेशन प्ले ऑफ लढतीत खेळावे लागेल.
थायलंड आणि व्हिएतनाम यांना रविवारी झालेल्या आपापल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे प्ले ऑफ लढतीतून चमकदार कामगिरी करत दोन्ही संघांना सकारात्मकरीत्या घरी परतण्याची संधी होती आणि यामध्ये सध्या व्हिएतनाम संघ वरचढ ठरला. व्हिएतनामने सामन्याच्या पहिल्याच सत्रात दोन गोल करत एकहाती वर्चस्व राखले.

थायलंड संघ अजूनही कोरोना संक्रमणातून सावरला नसल्याचे त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर दिसून आला.व्हिएतनामनेही आक्रमक सुरुवात करताना सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून आपले नियंत्रण राखले. कर्णधार ह्युन न्हू हिने १९ व्या मिनिटालाच पहिला गोल करत व्हिएतनामला आघाडीवर नेले. गोलजाळ्याच्या बरोबर समोर येऊन तिने गोल करत संघाला शानदार सुरुवात करुन दिली. पाचच मिनिटांनी व्हिएतनामने आपली आघाडी दुप्पट केली. एनग्युयेन थी तुयेट डंगने दिलेल्या क्रॉस पासवर थाइ थी थाओने अप्रतिम गोल केला. व्हिएतनामचा हा धडाका पाहून थायलंडची लय बिघडली. मध्यंतराला २-० गोल अशी आघाडी कायम राखलेल्या व्हिएतनामने दुसºया सत्राच्या तीन मिनिटांनी आपला तिसरा गोल जवळपास केलाच होता. पण थायलंडच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या फाम हाइ येनला गोल करता आला नाही. तसेच दोन मिनिटांनी ह्यून न्हूने चेंडू गोलजाळ्यात ढकललाह, मात्र ‘वार’ नियमामुळे न्ह्यूने केलेली आगेकूच ऑफ साइड ठरल्याने हा गोल यशस्वी ठरला नाही.

सामन्याच्या अखेरच्या क्षणामध्ये रेड कार्डचे नाट्यही रंगले. थायलंडच्या गोलक्षेत्रात जबरदस्त आक्रमण केलेल्या एनग्युयेन थी थान नाह हिला गोल करण्याची सुवर्ण संधी मिळाली होती, मात्र थायलंडच्या कांचनापोर्न साएनखुनने तिला खाली पाडल्याने तिला रेड कार्डला सामोरे जावे लागले. यावेर मिळालेल्या फ्री किकवर व्हिएतनामचा गोल चुकला, परंतु त्याचा सामन्याच्या निर्णयावर काहीच फरक पडला नाही. आता रविवारच्या लढतीत व्हिएतनाम चायनिज तैपईच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...