पुणे : पर्वती विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी शक्ती प्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला .यावेळी अरण्येश्वर येथील त्यांच्या निवासस्थाना पासून त्यांनी मिरवणुकीने जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . यावेळी त्यांच्या समवेत कॉंग्रेसचे आमदार अनंतराव गाडगीळ ,मोहन जोशी ,अरविंद शिंदे तसेच विशाल तांबे,बाळा ,धनकवडे ,डॉ. सुनीता मोरे ,अनिल सातपुते,सतीश पवार आदी मान्यवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती .
अर्ज भरण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना अश्विनी कदम म्हणाल्या, मला मतदार संघाचा अनुभव असून मी स्थानिक आहे.मी तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहे. त्यामुळे मला स्थानिक जनतेचे प्रश्न माहिती आहेत. मतदार संघात विकास कामे झालेली नाहीत. अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. काँग्रेसचे नाराज नगरसेवक आबा बागुल यांची मी लेकच आहे. ते मला पित्यासमान असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांची समजूत काढण्यात यशस्वी होतील. आबा लेकीसाठी नक्की माघार घेतील अशी भावनिक साद यावेळी त्यांनी घातली .

