पुणे जिल्ह्यात सरासरी 56 टक्के मतदान तर शहरात 46 टक्के मतदान

Date:

पुणे-विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यात सरासरी 56 टक्के तर, शहरात 46 टक्के मतदान झाले. 2014 मध्ये 61 टक्के मतदान झाले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या निवडणुकीत 367 ‘ईव्हीएम’ बंद पडल्या होत्या. 15 ते 20 मिनिटांत या मशीन सुरू करण्यात आल्या. हे प्रमाण 0.5 टक्के आहे. वडगावशेरी, शिवाजीनगर, पुरंदर तालुक्यात या मशीन बदलण्यात आल्या. सायंकाळी 6 नंतर 100 ठिकाणी मतदान करणे सुरू होते.सायंकाळी पाच वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात ३६.०८, पुणे कॅन्टोंमेंट -३८.४, शिवाजीनगर -३९.०७, वडगाव शेरी ४१.०८, कोथरुड – ४३.२३, पर्वती- ४५.०७ आणि हडपसरमध्ये ४८.८४ टक्के मतदान झाले होते. पिंपरीमध्येही केवळ ४२.६७, चिंचवडमध्ये ५१.३३, भोसरीमध्ये ५२.५२ टक्के मतदान झाले. तुलनेने ग्रामीण भागात मात्र मतदानाचे प्रमाण चांगले होते. भारतीय जनता पक्षाचे हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात चुरस असलेल्या इंदापूरमध्ये तब्बल ७४.२५ टक्के मतदान झाले होते. मावळमध्येही भाजपाचे बंडखोर सुनील शेळके राष्ट्रवादीकडून राज्य मंत्री बाळा भेगडे यांना आव्हान दिल्याने निर्माण झालेल्या चुरशीच्या वातावरणामुळे ६४.३६ टक्के मतदान झाले. बारामतीतत ६४.०६ टक्के, आंबेगाव- ६३, खेड -६१.३९, दोंड ६१.१५, जुन्नर ६०.०७, भोर- ५९.६५, शिरूर ५८.८१, पुरंदर ५७.६ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर दिवसभरात मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. दिवसभरात सुरळीत व शांततेत मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 55 ते 56टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिणी सावंत, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्हयातील सर्वच मतदार संघात उत्साहात मतदान झाले असून  जिल्हयातील सर्वच मतदारसंघात शांततेत मतदान झाले.
सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांचा उत्साह…
पुणे जिल्हयातील 7 हजार 915 मतदान केंद्रांवर सकाळी मॉकपोल घेऊन सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 21 मतदार संघातील 21 मतदान केंद्र हे सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रावर महिला कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाजीनगर येथील सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या लक्षणीय दिसून येत होती.  केंद्रावर मतदारांसाठी पिण्यासाठी पाणी, वीज व आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.
मतदान यंत्राला  व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात आल्याने मतदाराला आपण केलेल्या उमेदवारालाच मतदान झाल्याचे दिसून येत असल्यामुळे व्हीव्हीपॅट मशीनविषयीही मतदारांमध्ये उत्सुकता दिसून येत होती. आपण केलेल्या उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी स्क्रिनवर  बघायला मिळत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत होते. निवडणुकीच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्त  ठेवण्यात होता. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांना मतदान केंद्रावरील पोलीस सहकार्य करीत असल्याचे दिसून येत होते.
नवमतदारांचा उत्साह…
निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना विशेष सुविधा दिल्याने दिव्यांग मतदार, महिला मतदार, नवमतदारांनी  स्वयंस्फूर्तीने मतदान केल्याने अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या.
सकाळपासूनच प्रथमच मतदान करीत असलेल्या तरुण, तरुणीमध्ये उत्साह जाणवत होता. अनेक केंद्रावर मतदान करण्यासाठी महिला व पुरुषांसह तरुण व तरुणींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवाजीनगर येथील कु. वर्षा चांदियाल हिने प्रथम मतदानाचा हक्क बजावत असल्याचे सांगितले. शिवाजीनगर येथील विद्याभवन हायस्कूलच्या सखी मतदान केंद्रावर महिला मतदारांनी उत्साहात मतदान केले.  पुणे कॅन्टोमेंट येथील सेंट मिराज स्कूल  येथे कपिल गुलवाणी व प्रज्ञा कुकडे यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणे आपला अधिकार आहे, आणि तो आपण बजावला पाहिजे, असे मत प्रज्ञा कुकडे यांनी व्यक्त केले. त्यांच्याप्रमाणेच बहुतांश नवमतदारांमध्ये उत्साह दिसत होता.
वयोवृदधांचेही उत्साहात मतदान
कसबा पेठ येथे 89 वर्षाच्या श्रीमती नलिनी परांजपे या आजींनी आपल्या कुटुंबियांसह उत्साहात मतदान करुन आजच्या तरुण पिढीला मतदानासाठी प्रोत्साहन दिले. अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व महिला मतदारांना स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने मदत करताना दिसत होते.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माधव भंडारींना पुन्हा डावलले …विधान परिषदेसाठी भाजपचे ३ उमेदवार जाहीर

मुंबई-संघ परिवारातील निष्ठावंत असा लौकिक प्राप्त असलेल्या माधव भंडारींना...

वाचनीय वैचारिक लेखनाकडे वळायला हवे-डॉ. सदानंद मोरे

पुणे –“दर्जेदार वैचारिक लेखन हे इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत...

औरंगजेब समजून बहादूर शाह जफरांचा फोटो जाळला:पुण्यात ‘पतित पावन संघटने’कडून मोठी गफलत

बहादूर शाह जफर हे मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट होते....

महापालिकेची उद्याने आता रात्री नऊ वाजेपर्यंत खुली-उद्यान विभाग प्रमुख अशोक घोरपडे

पुणे- उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या सुरू असल्याने...