मित्रत्व कि शिष्टत्व : कसब्यात कळीचा मुद्दा…

Date:

पुणे – प्रत्यक्षात आता जाती पाती च्या बाहेर जावून मित्रत्वाच्या वातावरणात मतदाराला  सामावून घेऊन,आपली समस्या स्वतःची समजून , प्रसंगी अभ्यासू कार्यशैलीने अडचणींवर मात करून सुरळीत सुसह्य जीवन उपलब्ध करून देणाऱ्या उमेदवाराला कसबा कायम स्वीकारत आला आहे आणि याच मार्गावर आज हि कायम असूनही,राहूनही   आता मात्र कसब्यात इतिहास घडेल असा आशावाद वैचारिक मतदारांच्या पातळीवर दिसतो आहे.

कसब्याचा  ‘जातीय रंग ‘खोटा ?

खरे तर वैयक्तिक आणि खाजगी जीवनात आजकाल जाती पातीचे कोणाला काही फारसे उरलेले  नाही . पण जाती पातीत तेढ निर्माण करणारे प्रसंग,घटना आणि विचारांची पेरणी  मात्र नेहमी सातत्याने होत आली आहे. आणि त्यास अनेकदा सामान्य ,ज्याच्या जीवनशैलीत  प्रत्यक्षात जाती पातीला महत्व नाही असाच माणूस बळी पडल्याचे दिसले आहे. कसबा मतदार संघ हा ब्राम्हण मतदारांचे वर्चस्व असलेला मतदार संघ आहे हा कसब्यावर बसलेला शिक्का आहे . त्यास कारण देखील आहेच.ते हि कि, इथे सातत्याने ब्राम्हण समाजाचाच आमदार निवडून आला आहे . भाजपचे बापट इथे 25 वर्षे आमदार होते आणि आता ते खासदार आहेत .पण त्यांनी ज्यास विधानसभेत पाडले त्यात रोहित टिळक नावाचे अन्य एक ब्राम्हण उमेदवार देखील होते याकडे देखील् लक्ष वेधले जाते आहे.

कसबापेठ मतदारसंघातील जातीय समीकरण

समाज जात/धर्म तपशील अंदाजे म. संख्या
मुस्लीम 27500
अनुसूचित जाती (एस. सी.) 29000
अनुसूचित जमाती (एस. टी.) 12500
इतर मागासवर्गीय 97500
मराठा व कुणबी 78000
ब्राह्मण 37000
इतर घटक (जैन,ख्रिश्चन इ.) 18500
एकूण मतदारसंख्या सरासरी 300000

म्हणजेच निव्वळ ‘मोठ्ठ घर आणि पोकळवासा …असे नकोय तर कसब्याला आपल्या कोणाशी हि बोलेल ,प्रश्न जाणून घेईल ,त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न करेल असाच आमदार हवाय , दादागिरी करणारा , शिष्ट किंवा शाही थाटात वागणारा नकोय असे हि म्हणता येईल .आणि बापट हे बहुतांशी काळ विरोधी पक्षाचे आमदार होते आणि त्यावेळी त्यांचा  अन्य पक्षांतील लोकांशीही सुसंवाद होता .नेमका हाच त्यांचा स्वभाव इथे कायम विजय मिळवून देत गेला . पण तरीही मूळ पुण्याच्या समस्या मात्र अजूनही मूळ पुण्याला चिकटून आहेत हे मात्र दुर्दैव आहे .खरे तर इथे ब्राम्हण समाजाचा मतदार केवळ ३७ हजाराच्या आसपास आहे आई अन्य समाजाची मते सुमारे २ लाख ७० हजाराच्या घरात आहेत .आता ब्राम्हण समाजाची मते एक गठ्ठा राहतात आणि इतर समाजची मात्र विभागली जातात असे कोणी म्हणेल पण तशा म्हणण्याला कुठे आधार सापडत नाही. कारण

 कसबा पेठ लोकसभा 2019 मते
भाजप 103583
काँग्रेस 51192
वंचित 2471
नोटा 1831
पोस्टल वोट विभागून 2079
एकूण मतदान 161156
एकूण मतदार अं 285890

कारण भाजपच्या बापटांना कसब्या ने अलीकडच्याच लोकसभेला  दिलेले मताधिक्य प्रचंड आहे .पण म्हणून तेच विधानसभेला राहील असे मात्र म्हणता येणार नाही कारण आता भाजपचा उमेदवार च बदललाय एवढेच  नाही तर नागरी समस्यांशी थेट संबधित निर्णय घेणारी हि निवडणूक आहे.विधानसभा ,मंत्रालय आणि महापालिकेला आदेश देवून कामे करवून घेणारे मंत्रालय या निवडणुकीशी थेट संबधित असणार आहे .

खरे तर मेख इथेच आहे . जुने ते सोने असे लोक विविध क्षेत्रात अजूनही बोलतात . तसेच जुन्या पुण्याचे गोडवे ते काय गावे …खरोखर एक शांत , निसर्गरम्य असे पुणे शहर होते .मूळ पुणे होते ,जे ऐतिहासिक देखील आहे . पण या जुन्या पुण्याची आता वाट लागलीय .जुने  वैभव आता नाहीसं झालंय, बदलत्या जमान्याला सामोरे जात का होईनात पण इथे हि लोकांचे मुलभूत हक्क जपले गेले पाहिजे होते ज्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेल्याने मूळ पुणे सोडून लोक राहण्यासाठी बाहेर ,बाहेर जावू लागले.बाहेरून येणाऱ्या लोकांची वाहने यावीत जावीत ,आणि ती उभी करता यावीत म्हणून या मूळ पुणेकरांच्या हक्कावर गदा आणली गेली ,त्यांच्या जागा हिरावून घेण्यात आल्या .बाहेरील पाहुण्यांनी कोतवाल चावडी सारखी ऐतिहासिक वास्तू हि शिल्लक ठेवल्या नाहीत .अशा हि अवस्थेत मूळ पुणेकराने साऱ्या व्यथा सोसत तक्रारी केल्या नाहीत .

पण आता हे सारे सोसून आमचे हक्क ,आमचे प्रश्न घेऊन आम्ही आमच्या मतांवर निवडून आलेल्या आमच्या लोकप्रतिनिधीकडे गेलो आणि त्याने शिष्ट कारभार केला ,’मी कोणी फार मोठा ‘ आहे असा आवेश ठेवून वर्तन ठेवले तर निमुटपणे माघारी यायचे काय ?हा प्रश निराम्न होवू पाहतो आहे. मला हक्काने सांगता येईल कुठे हि कधी हि बोलता येईल ,गाऱ्हाणी  सांगता येतील आणि ‘तो ‘ हो तातडीने आपली स्वतःची अडचण समजून त्यावर हालचाली करेल ,प्रेमाने मित्रत्वाने आपल्याशी संवाद करेल , आणि असलाच भ्रष्ट कारभार तर त्याला मोडून काढेल असा लोकप्रतिनिधी खरे तर आता जनतेला हवाय ..निव्वळ नाव मोठ्ठ, आणि शिष्टाई चा डोंगर मेंदूत …  काय झालं जर ,इतरांच मेलं  ; स्वतःच तर  भागलं ..अशी वृत्ती असणारी पुढारी मंडळी कसबा या निवडणुकीत हद्दपार करू शकणार आहे.

‘नोटा’ हा सुद्धा कायदेशी अधिकार आणि खऱ्याखुऱ्या लोकशाहीचा सुयोग्य महामार्ग –

गेल्या पाच वर्षापूर्वीच म्हणजे 2014 च्या कसब्याच्या  विधानसभा निवडणुकीत ४८९ मतदारांनी योग्य लायक उमेदवार नसल्याने नोटाला मतदान केले होते हि संख्या आता झालेल्या लोकसभेला १८६० वर गेली आहे. यामध्ये २९ पोस्टल म्हणजेच शासकीय नोकरदार मतदारांनी सर्व उमेदवारांना नाकारले आहे.  म्हणजेच विद्यमान खासदार यांना देखील लोकसभा निवडणुकीत १८६० मतदारांनी नाकारले आहे.मतदान करणे हा हक्क आणि कर्तव्य जरूर आहे. पण म्हणून का कोणाही अपात्र उमेदवाराला मतदान करून पायावर धोंडा पाडून घ्यायचा काय ?तर अशा वेळी ‘नोटा ‘म्हणजे यातील एक हि उमेदवार पसंत नाही हा पर्याय दिला आहे आणि तो देखील मतदाराचा कायदेशीर हक्क आहे हे विसरता कामा नये . आता काही राजकीय लोक असा प्रचार करतात ,कि मत वाया कशाला घालविता ? पण हा प्रचार निव्वळ स्वार्थी प्रचार असतो हे ध्यानांत घ्यायला हवे . झालेल्या मतदानात सर्वाधिक  टक्केवारी अशा ‘नोटा’ मतदानाची निघाली तर न्यायालयांना देखील हि यात निवडून आलेल्या उमेदवाराला घरीच पाठवावे लागेल , ग्राह्य धरता येणार नाही हे निर्विवाद आहे. .हळू हळू आता ‘नोटा ‘ चे हे महत्व नागरिकांना समजू लागलेय आणि ते जसे सर्व व्यापी होईल तसा भारतीय लोकशाहीत अमुलाग्र बदल होवून; शिस्तीच्या नावाखाली शिष्ट स्वभावाचा कारभार हाकणारे ,राजेशाही राबवू पाहणारे ,मनमानी करणारे ,फसवेगिरी आणि संधी साधू राजकारण्यांचा यांचा पाडाव होईल आणि लोकात मिसळणारे ,जन मैत्रीची भावना दृढ करणारे नागरिकांची समस्या हि आपली स्वतःची समस्या मानून त्यावर उपाय योजना करणारे ,प्रशासनातील हेकेखोर ,अपप्रवृत्तीला वेळीच ठेचणारे यांचा राजकारणात उदय होईल आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची हिरवळ ,लोकशाहीचा सुगंध देशभर दरवळू लागेल यात शंका नाही .’नोटा ‘चा उद्देशच चांगली ,सत्प्रवृत्तीची माणसे राजकारणात येणे हा आहे हे लक्षात घेतले पाहिजे .एवढे सारे असले तरी राजकीय पक्ष मात्र उमेदवारी देताना काय पाहतात ?हा प्रश्न जर प्रत्येकाने स्वतःला विचारून पाहिला तर आपले उत्तर निश्चितच मिळेल .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...

प्रशांत जगतापांच्या राजीनाम्याचे वृत्त बदमाशीचे ..खोडसाळ

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप...